एक्स्प्लोर

शरद पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीनं नैराश्येतून धमकी दिल्याचा संशय; पोलिसांची कोर्टात माहिती

Sharad Pawar Threat Case: आरोपी सागर बर्वेनं नैराश्येतून धमकी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच, लग्न होत नसल्यानं आणि सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणानं सागर बर्वे नैराश्येत असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.

Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरून (Social Media) धमकी देणाऱ्या सागर बर्वेला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. अशातच आरोपी सागर बर्वेनं नैराश्येतून धमकी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच, लग्न होत नसल्यानं आणि सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणानं सागर बर्वे नैराश्येत असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. 

सागर बर्वेनं दोन बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करुन शरद पवारांबाबत अपशब्द लिहिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी फेसबुककडूनही काही माहिती मागवली आहे. 

प्रकरण नेमकं काय? 

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवर 'नर्मदाबाई पटवर्धन' या नावानं एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. 

शरद पवारांना धमकी देणारा सागर बर्वे तपासात सहकार्य करत नाही, मुंबई पोलिसांची कोर्टात माहिती 

सागर बर्वेनं या आधीही सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा दिसून आलं आहे.  एवढंच नाही तर तो ज्या वात्सल्य पुरम सोसायटीत रहातो त्या सोसायटीच्या सदस्यांनीही त्यामुळे त्याच्यापासून चार हात दूर राहणंच पसंत केल होतं. सागर बर्वेच्या या आधीच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहता तो एका विशिष्ट विचारसरणीने भारावून गेल्याचं स्पष्ट दिसत आहे.  मात्र पोलिसांच्या मते त्याचे कोणत्याही संघटनेशी थेट संबंध असल्याच आतापर्यंत समोर आलेलं नाही. तो तपासात सहकार्य करत नसल्याने मुंबई पोलीसांनी फेसबुक आणि ट्विटरशी संपर्क साधून आणखी माहिती मागवली आहे.  त्यातून सागर बर्व एका महिलेचे नाव धारण करून हे उद्योग का करत होता? हे समोर येण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
Embed widget