एक्स्प्लोर

Sharad Pawar : सोनिया दुहन ते धीरज शर्मा, संग्राम जगताप ते रोहित पवार, निर्णय मागे घेताना पवारांच्या मागे कोण कोण?

Sharad Pawar Takes Back Resignation: राजीनामा मागे घेताना शरद पवारांनी पक्षाची भविष्यातली वाटचाल कशी असेल, नव्या नेतृत्वाला कुठे स्थान असेल याचे संकेत दिल्याचं स्पष्ट आहे. 

मुंबई: कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतो, पण कोणतंही जबाबदारीचं पद स्वीकारणार नाही असं शरद पवार यांनी जाहीर केलं आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. शरद पवारांच्या निर्णयाकडे अवघ्या देशाचं लक्ष होतं. शरद पवार बोलत होते, त्यांच्या मागे मात्र राष्ट्रवादीचे नेहमीचे नेते दिसत नव्हते. शरद पवारांच्या फ्रेममध्ये दिसत होते ते आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार, सोनिया दूहन, धिरज शर्मा आणि राष्ट्रवादीचे इतर युवा नेते. 

शरद पवारांची पत्रकार परिषद म्हटल्यावर त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते हमखास उपस्थित असणार. शरद पवारांच्या कोणत्याही निर्णयावेळी हे नेते त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. पण आता ते चित्र दिसत नव्हतं. 

Sharad Pawar PC : शरद पवारांची फ्रेमच सर्वकाही बोलत होती..

जेव्हा पवार म्हणाले की भाकरी फिरवण्याची वेळ आलीय. तेव्हा अनेकांना वाटलं की मोठा बदल होणार आहे. शरद पवारांनी 2 मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली. आज जेव्हा पवारांनी आपणंच अध्यक्षपदावर कायम राहणार अशी घोषणा केली तेव्हा जाणीवपूर्वक आणखी एक घोषणा केली. संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे असं पवार म्हणाले. पण जेव्हा पवार हे बोलत होते तेव्हा त्यांची फ्रेमही बोलत होती. कारण फ्रेममध्ये पहिल्या फळीत ज्येष्ठ नेते होते आणि दुसऱ्या फळीत पक्षाचे तरुण नेते.

पवारांच्या पाठीमागे आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दूहन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यासह तरुण नेते होते. त्यामुळे पवारांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट दिसून आला.

Supriya Sule Or Ajit Pawar : सुप्रिया सुळे की अजित पवार? 

राष्ट्रवादी पक्षात मोठा बदल होणार हे जवळपास स्पष्ट झालंय. हे सगळं बोलत असतानाच पवारांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं, ते होतं सुप्रिया सुळेंसदर्भातलं. एनसीपीचे नेते भाजपात जाऊ इच्छितात आणि सुप्रिया सुळे पुढच्या अध्यक्ष होतील या गोष्टीत तथ्य नाही. त्या कार्याध्यक्ष वगैरे होणार नाहीत असं म्हणत असतानाच पवारांनी नवं नेतृत्व निर्माण करावं असं म्हणत नेत्यांसमोर आव्हान निर्माण केलंय.

शरद पवार एवढी मोठी घोषणा करत असताना अजित पवारांची अनुपस्थिती मात्र अनेकांच्या डोळ्यात दिसत होती. पण पवारांनी वेळ साधून नेली. असं असलं तरी शरद पवारांनंतर पक्षात नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडे पाहिलं जातं. असेच संकेत छगन भुजबळांनीही दिले होतेच.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाची धाटणी वेगळी आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाचा बाज हा ग्रामीण आणि रांगडा आहे. तर सुप्रिया सुळे यांची भाषा, राहणीमान शहरी मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणारं आहे. अजित पवार हे बेधडक, अत्यंत स्पष्ट आणि तात्काळ निर्णय घेणारे आहेत. सुप्रिया सुळे या विचार करून, मुद्देसूद अभ्यासपूर्ण बोलण्यासाठी ओळखल्या जातात. अजित पवारांचा वावर हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये राहिलाय. सुप्रिया सुळेंचे नेटवर्क देशातील प्रत्येक पक्षामध्ये आहे. अजित पवार यांची ग्रामीण भागातील प्रश्नांवर मजबूत पकड आहे. सुप्रिया सुळे प्रामुख्याने महिला, गरीब यांच्या प्रश्नांवर हिरारीने भूमिका घेतात

प्रशासनाचा गाडा खंबीरपणे हाकणे ही अजित पवार यांची मोठी ओळख आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रशासन कौशल्याची महाराष्ट्राला फारशी ओळख नाही. निवडणुकांचं गणित आणि त्यासाठीची पक्षीय बांधणी यात अजित पवार तरबेज आहेत. सुप्रिया सुळे यांचं या मुद्द्यांवरचं कौशल्य अजूनही पडद्यामागचं आहे. मराठा समाजाचा, बड्या शेतकऱ्यांचा, साखरसम्राटांचा पक्ष अशी राष्ट्रवादीची ओळख आहे. अजित पवार त्या ओळखीसाठी चपखल बसतात. सुप्रिया सुळे यांच्या व्यक्तिमत्वात आणि नेतृत्वात पक्षाची ही ओळख प्रतिबिंबित होत नाही.

त्यांच्या दोघांच्या स्वभावातला फरक राजीनाम्याच्या घोषणेतही दिसला होता. आजही जेव्हा पवारांनी आपला निर्णय मागे घेतला त्याआधी पवारांच्या घरी बैठक झाली. त्यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार दोघेही पवारांसमोर बसले होते. मात्र तिथून जेव्हा पवार वायबी सेंटरला आले, आपला निर्णय मागे घेतला तेव्हा त्यांच्यासोबत प्रतिभा पवारांसह सुप्रिया सुळेही होत्या. पण अजित पवार त्या ठिकाणी नव्हते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget