एक्स्प्लोर

तरुणांनो, मी तुमच्या पाठीशी आहे : शरद पवार

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात सरकारविरोधी लिखाणाच्या आक्षेपावरुन ज्या विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. त्या तरुणांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली.

मुंबई : एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा प्रश्न फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्वासनही पवारांनी यावेळी दिले. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात सरकारविरोधी लिखाणाच्या आक्षेपावरुन ज्या विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. त्या तरुणांनी आज मुंबईत शरद पवारांची  भेट घेऊन चर्चा केली. https://twitter.com/PawarSpeaks/status/919155504722599936 यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात जी व्यक्ती सध्या ओएसडी म्हणून कार्यरत आहे, ती व्यक्ती अशा प्रकारांना कारणीभूत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयात काय चालतं, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे.
“सोशल मीडियावर लिहिणारे ७०च्या आसपास तरुण महाराष्ट्रभरातून येऊन आज मला भेटले. ते कुठल्या राजकीय विचारांचे किंवा पक्षाचे दिसत नाहीत. पण लोकशाहीचा मूलभूत अधिकार व सेक्युलरिझम या गोष्टींबाबत त्यांची भूमिका आग्रही आहे. कुठे विसंगती दिसल्यास फेसबुकवर आपली मतं ते व्यक्त करतात. परंतु या तरुणांना धमकावण्याचा प्रकार त्यांच्या भागांमध्ये स्थानिक पोलिसांकडून होत आहेत. त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. पक्षीय दृष्टिकोनातून नाही. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू. या तरुणांच्या विरोधात नोटिसा व खटले भरले जात आहेत. त्यासंबंधी कायदेशीर सल्लागारांमार्फत सहाय्य करण्यासाठी एक विभाग आम्ही सुरू करत आहोत.” – शरद पवार
काय आहे प्रकरण? काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ‘देव गायकवाड’ नावाच्या फेक अकाऊंट प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार यांनी याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. सायबर सेलमध्ये या प्रकरणी गुन्हा क्र. 109/2017 नुसार भादवि कलम 419, 420, 465, 468, 469, 471 आणि 354D, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66C, 66D आणि 67 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, महेंद्र रावले यांसह काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मुंबईतील कांजुरमार्ग पोलिस ठाण्याने बजावली आहे. पोस्टमुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नोटीस मिळालेले युवक:
  1. आशिष मेटे , औरंगाबाद
  2. मानस पगार , नाशिक
  3. विकास गोडगे , उस्मानाबाद
  4. शंकर बहिरट , पुणे
  5. योगेश वगाज , सोलापूर
  6. श्रेणिक नरदे , कोल्हापूर
  7. सचिन कुंभार , सांगली
  8. ब्रम्हा चट्टे, सोलापूर
इतर तरुण :
  1. डॉ. अमर जाधव
  2. मल्हार टाकळे
  3. योगेश बनकर
  4. आकाश चटके
  5. राहुल आहेर
  6. योगेश गावंडे
  7. इम्रान शेख
  8. शरद पवार
  9. अमित देसाई
  10. धीरज वीर
  11. भाऊसाहेब टरमले
  12. मयुर अंधारे
  13. अक्षय वळसे
  14. अक्षय गवळी
  15. प्रदिप तांबे
  16. विकास मेंगाणे
  17. विकास जाधव
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget