एक्स्प्लोर

ईडी कार्यालयात येऊ नका, शरद पवारांचं आवाहन; मात्र कार्यकर्ते म्हणतात 'आमचं ठरलंय'!

शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं शरद पवार, अजित पवारांसह 70 सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल केलाय. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्या ईडी कार्यालयात जाऊन, अधिकाऱ्यांना सगळी माहिती देणार आहेत.

मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर कुठल्याही प्रकारची गर्दी करु नका, असं आवाहन पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ईडी कार्यालयाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसंच तिथं शांतता राखली जावी याची काळजी घ्या, असं आवाहन पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. दरम्यान, उद्या ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे, असे पवार यांनी म्हटलं आहे. सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.  पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य  करावे, असे आवाहन पवारांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र आम्ही मुंबईला येणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या जात आहेत. शरद पवार हे सर्व कार्यकर्त्यांचे विठ्ठल आहेत. त्यांच्यासोबत आपण स्वत: जाणार असून सर्व कार्यकर्त्यांनीही हजर राहण्याचं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. शरद पवारांच्या ट्वीटला उत्तर देताना आव्हाड यांनी माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय. वय वर्ष 79. हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय. उद्या साठी माफ करा. ह्या सगळ्या आपण एकटाच लढलात. सगळ्या संकटांवर मात केलीत . ह्या लढाईत मात्र तुम्हाला साथ द्यायला महाराष्ट्र तयार आहे. म्हणून साहेब 35 वर्ष तुम्ही जे सांगितलं ते ऐकलं. पण ह्यावेळेस माफ करा, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं शरद पवार, अजित पवारांसह 70 सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल केलाय. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्या ईडी कार्यालयात जाऊन, अधिकाऱ्यांना सगळी माहिती देणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटनNarendra Modi Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल, दिग्गज नेत्यांची उपस्थितीदुपारी १ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PMSupreme Court Youtube Channel Hack : सुप्रीम कोर्टाचं यूट्युब चॅनल प्रायव्हेट कंपनीकडून हॅक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Embed widget