एक्स्प्लोर

'लाडकी बहीण योजने'वर शरद पवार पहिल्यांदाच बोलले; अजित पवारांचं नाव घेत आर्थिक ताळेबंदच संगितला

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांवर भाष्य केले

पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki bahin Yojana) या महत्वाकांक्षी योजनेवरुन विरोधकांकडून राज्य सरकारला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. दुसरीकडे या योजनेचं गावोगावी स्वागत होत असून महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही राज्य सरकारच्यावतीने केलं जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही आपल्या प्रत्येक भाषणात, कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना महिलांना या योजनेतून आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातं. या योजनेवरुन विरोधकांनी टीकाही केली आहे. लाडक्या भावांचं काय, अस सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला होता. आता, शरद पवार (Sharad Pawar) यांनीही लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांवर भाष्य केले. त्यामध्ये, विधानपरिषद निवडणुकीतील पराभव, भुजबळांची भेट, राज ठाकरेंचं ट्विट यांसह विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, कर्नाटक सरकारने नोकरीत 80 टक्के आरक्षण भूमिपुत्रांना देण्याचा निर्णय घेतला व राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, कर्नाटक सरकारचा निर्णय कोर्टात टिकणार नाही, असे पवार यांनी म्हटले. तसेच, लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं. 

लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ.. हे यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलंय. पण, महाराष्ट्रात अजित पवार आणि जयंत पाटील यांन 6 ते 7 वेळा बजेट मांडायची संधी मिळाली. या 6 ते 7 वेळेत बहीण भाऊ कुठेही आलेले दिसले नाहीत. बहीण भावांचा विचार होतोय याचा आनंद आहे. मात्र, हा सगळा चमत्कार लोकसभा निकालातील मतदारांच्या मतांचा आहे, असे म्हणत शरद पवारांनी महायुती सरकारला पवारस्टाईल टोला लगावला. मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण-भाऊ सर्वांची अडचण होते. मलाच एकच काळजी आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे. 

महाराष्ट्रावर अंदाजे 7 लाख कोटींचं कर्ज

महाराष्ट्र हा देशातील 2 ते 3 क्रमांकावरील राज्य होते, मात्र नियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये, महाराष्ट्र 11 व्या क्रमांकाचे राज्य आहे, हे चिंता करण्याचे चित्र आहे. सध्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, अंदाजे 7 लाख 80 हजार कोटींचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. यावर्षीचं आत्ताचं कर्ज 1 लाख 10 हजार कोटींचं कर्ज हे वेगळं आहे, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली. 

हेही वाचा

हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला, दादांनी अनुभव सांगितला; फडणवीस म्हणाले, घाबरु नका मी असल्यावर काहीही होत नाही

महिन्याला 1500, वर्षाला 18 हजार, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार, पंढरपूरच्या भूमीत मुख्यमंत्री म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane MNS Dahihandi 360 Degree : ठाण्यात मनसेची दहीहंडी, ड्रोन टीपलेला थरार पाहा!ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 27 August 2024CM Eknath Shinde Magathane Dahi Handi : मागेठाणेमधील दहीहंडी सोहळ्यात शिंदेंनी फोडली हंडीBhau Kadam and Kirit Somaiya : ढगाला लागली कळं…भाऊंचं गाणं, सोमय्यांचा डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके अन् सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; दिल्लीत होणार गौरव
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
पुतळा दुर्घटनेचा कायदेशीर लढा, ठाकरेंच्या आमदाराचं वकिलांस पत्र; किती फी देणार हेही सांगितलं?
Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
Gautam Gambhir Wife Natasha : पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
Embed widget