Sharad Pawar Resigns LIVE UPDATES: शरद पवारांनी राजीनामा परत घ्यावा; शरद पवारांच्या बहीण सरोज पवार यांची प्रतिक्रिया
Sharad Pawar Resigns: शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय कार्यकर्त्यांकडून मात्र विरोध, निर्णय मागे घेण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन
LIVE
Background
Sharad Pawar Resigns LIVE Updates: शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवारांचं (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही.
"मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे," असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले.
पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी सेंटरमध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यासाठी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यक्रत्यांना अश्रू देखील अनावर झाले. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाय पडून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.
शरद पवारांचं (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, एबीपी माझाआणि एबीपी न्युजचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा सोहळा पार पडला. लोक माझे सांगाती पुस्तकातील नव्या आवृत्तीत 75 पानं वाढवण्यात आली आहेत. शरद पवारांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे.
Sharad Pawar Resigns: राजीनामा सत्र थांबवण्याचं शरद पवारांचं आवाहन
कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तर शरद पवार निर्णय बदलणार नाही - अजित पवार
राजीनामा सत्र थांबवण्याचंही शरद पवारांचं आवाहन
Sharad Pawar Resigns: शरद पवारांना निर्णयाबद्दल विचार करायला दोन ते तीन दिवस हवे
पवार साहेब असं बोलतील याची कोणाला कल्पना नव्हती - अजित पवार
शरद पवारांना निर्णयाबद्दल विचार करायला दोन ते तीन दिवस लागतील - अजित पवार
पक्षाचे मुख्य अधिकार पवारांकडेच राहणार - सूत्र
'राष्ट्रवादीत राष्ट्रीय कार्याध्यक्षाची नियुक्ती करावी'
'पवारांकडे सूत्र राहतील पण पक्षाचं कामकाज कार्याध्यक्ष पाहिल'
शरद पवारांसोबतच्या बैठकीत काही नेत्यांचं मत
Sharad Pawar Resigns LIVE : सिल्वर ओकवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली.
Sharad Pawar Resigns LIVE : राष्ट्रवादीच्या नेत्यांची सिल्वर ओकवरील बैठक संपली असून भुजबळ, अजित पवार सिल्वर ओकवरुन निघाले आहेत.
Sharad Pawar Resigns LIVE : अडीच तासांपासून वाय.बी सेंटर बाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या
Sharad Pawar Resigns LIVE :शरद पवारांच्या घोषणेनंतर कार्यक्रम आक्रमक झाले असून जो पर्यंत शरद पवार भूमिका घेत नाहीत तोपर्यंत इथून बाजूला न होण्याचा कार्यकर्त्यांनी पवित्रा घेतला आहे.