एक्स्प्लोर
जानकरांच्या 'त्या' वक्तव्यावर संयम राखा, पवारांचं फेसबुकवर आवाहन
मुंबई: भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या दसरा मेळाव्यावेळी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी खालच्या शब्दात टीप्पणी केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही जानकरांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांनी संयम व सहनशीलता बाळगण्याचे आवाहन केलं आहे.
''भगवानगडावरील भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय सरकारचाच असताना त्याच्याशी बारामतीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुरान्वयानेही संबंध नाही. परंतु, भाषणे करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली नाही. अशा असंस्कृतपणाच्या पातळीवर आपल्याला उतरता येणार नसल्याने संयम व सहनशीलता बाळगून शांतता राखावी,'' असे आवाहन पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.
तसेच एखाद्या मंत्र्याने एखाद्या भागाचे वाटोळे करीन, असे म्हणणे बेजबाबदारपणाचेच नव्हे तर मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग करणारे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शिवाय फडणवीस सरकार या प्रकाराची दखल कशी घेईल, याकडे लक्ष लागून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
शरद पवार यांची फेसबुक पोस्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement