एक्स्प्लोर
Advertisement
छबू नागरे राष्ट्रवादीत कसा आला ? : शरद पवार
नाशिक: भ्रष्टाचार, अपहार आणि बनावट नोटा यासारख्या एकामागोमाग एक प्रकरणांमुळं बदनाम होत असलेल्या नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वच्छता अभियान करणार असल्याचा इशारा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिला.
बनावट नोटा छापणारं छबू नागरे नावाचं रत्न राष्ट्रवादीत आलं कसं याचा शोध घेऊ, त्याला कुणी आणलं, का आणलं, कधी आणलं याचा शोध घेऊ असं सांगत बनावट नोटा छापणाऱ्यांना फाशीवर लटकवा, अशी थेट भूमिका पवारांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतली.
विशेष म्हणजे छगन भुजबळांच्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यानेच छबूला राष्ट्रवादीत आणल्याचं सांगण्यात येत आहे. यावरुन पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवारांनी तीव्र नाराजीही व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यात पवारांनी संपूर्ण दौऱ्यात जाहीर कार्यक्रमांमध्ये भुजबळांचा नामोल्लेखही टाळला.
पिंपळगावच्या शेतकरी मेळाव्याच्या होर्डिंगवरही भुजबळांना स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र भुजबळ समर्थकांची तीव्र नाराजी आणि माध्यमांच्या बातम्यांनंतर भुजबळांच्या छबी असलेले नवे होर्डिंग लावण्यात आले.
मोदी गडी बोलायला फार हुशार, 'ते' ऐकून मी मेलोच : शरद पवार
पत्रकार परिषदेत पक्षातल्या स्वच्छता अभियानाचं पहिलं पाऊल भुजबळांच्या छबीचा अनुल्लेख हा आहे का असा सवाल केल्यावरही पवारांनी त्यांच्या शैलीतच अस्पष्ट उत्तर दिलं. भुजबळांचं नाशिकमध्ये मोठं काम आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं असा काही निर्णय पक्ष आता घेणार नाही असं पवार म्हटले. त्यामुळं भ्रष्टाचार, अपहार प्रकरणावरुन अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीला आता भुजबळ आणि त्यांचे समर्थक डोईजड वाटू लागलेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमुळे पवार गप्प असल्याचं बोललं जात आहे. काय आहे छबू नागरे प्रकरण? नाशिक पोलिसांनी गुरुवारी 22 डिसेंबरला मध्यरात्री कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तर 1 लाख 80 हजाराच्या जुन्या खऱ्या नोटा, सुमारे दीड लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा, अशा एकूण 1 कोटी 39 लाखांच्या नोटा हस्तगत केल्या. बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करत 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून 3 आलिशान कारही जप्त केल्या. राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली. संबंधित बातम्यामोदी गडी बोलायला फार हुशार, 'ते' ऐकून मी मेलोच : शरद पवार
बनावट नोटा छापणाऱ्या छबू नागरेवर देशद्रोहाचा खटला?
नाशिक बनावट नोटा प्रकरण : 11 आरोपींच्या घरांची झडती
1.35 कोटींच्या बनावट नोटा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह 11 अटकेत
छबू नागरेची तीन बँक खाती सील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement