एक्स्प्लोर

अविनाश भोसले ते अनिरुद्ध देशपांडे, शरद पवारांच्या सात निकटवर्तींयावर ईडीची धाड

sharad pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं यासाठी अजित पवार वारंवार भेटीगाठी घेऊन सोबत येण्याबाबत विनंती करत आहेत.

sharad pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीए सोबत यावं यासाठी अजित पवार वारंवार भेटीगाठी घेऊन सोबत येण्याबाबत विनंती करत असतानाच दुसरीकडे शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केंद्रीय यंत्रणांच्या धाडी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकताच जळगावच्या ईश्वर लाल जैन यांच्या कंपन्यांवर ईडीच्या धाडी पडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांचे निकटवर्तीय ईडीच्या रडावर आल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन जुलैला फूट पडली आणि त्यानंतर पहिल्यांदाच ईडी कडून शरद पवारांना अप्रत्यक्षरीत्या टार्गेट करण्यात येत असल्याचं समोर आला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा वर्षे खजिनदार राहिलेल्या जळगावचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सचा मुंबई नाशिकसह सहा कंपन्यांवर इडी आणि आयकर विभागाने छापे मारले आहेत. यावेळी माजी आमदार मनीष जयंती यांचे देखील अधिकाऱ्यांना कसून चौकशी केली आहे. 

दिवसेंदिवस शरद पवार यांचे विरोधकांकडून तयार करण्यात आलेल्या आघाडीत महत्त्व वाढताना पाहिला मिळत आहे. अशावेळी शरद पवार यांना एनडीए सोबत घेऊन विरोधकांची आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावर होत आहे. याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांना देखील सोबत घेण्यात आला आहे. मात्र तरी देखील शरद पवार सोबत येत नसल्यामुळे ईडीचा ससेमिरा पुन्हा एकदा सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे 

आत्तापर्यंत धाडी पडलेले शरद पवारांचे निकटवर्तीय 

1) वाधवान बिल्डर (एचडीआयएल प्रकरण) मार्केटींग कंपनीची ८८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्या कार्यालयावर छापे आणि अटक.

2) दिवाण बिल्डर (डीएचएफएल प्रकरण) या प्रकरणात सतरा विविध बँकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असून यामध्ये अविनाश भोसले आणि वादवान बंधू यांच्या कंपन्यांना पैसा दिल्याचा आरोप आहे. अविनाश भोसले आणि वादवान हे दोघेही शरद पवारांचे निकटवर्ती आहेत 

3) अनिरुद्ध देशपांडे अॅमनोरा टाऊनशिप चे मालक आणि सिटी बँकेचे चेअरमन यांच्यावर ईडीची धाड. आर्थिक गैर व्यवहारातून या धाडी पडल्याची माहिती 

4) अविनाश भोसले डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयची कारवाई. भोसले यांचा एक हेलिकॉप्टर देखील ताब्यात

5) नरेश गोयल- जेट एअरवेज 538 कोटी रुपयांच्या गतीत बँक फसवणुकी प्रकरणी ईडीची कारवाई. नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी विरोधात मनी लॉन्ड्री

6) राणा कपूर येस बँकेचे अध्यक्ष असताना राणा कपूर यांनी डीएचएफएल, एचडीआयएल अबिल यासारख्या कंपन्यांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले आणि त्या बदल्यात लाच घेतली. येस बँकेने तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि त्यापैकी वीस हजार कोटी रुपये बुडीत कर्जात बदलले. यासाठी देखील लाच घेतल्याचा आरोप आहे 

7) ईश्वरलाल जैन- राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 वर्ष खजिनदार. प्रसिद्ध राजमल लकीचंद ज्वेलर्सचे मालक. माजी खासदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय 

केंद्रीय यंत्रणांकडून शरद पवारांचे आर्थिक संबंध असलेल्या 6 उद्योजकांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यावर सूचक भाष्य करताना रोहित पवार यांनी बीडच्या सभेत आपल्याला धनशक्तीविरोधात लढाई लढायची आहे. ही लढाई लढत असताना केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली होती  केंद्रीय यंत्रणांचा वाढता त्रास लक्षात घेऊन अजित पवार गटात जाणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी आहे. असं असताना देखील शरद पवारांनी मात्र नरमाईची भूमिका न घेता लढाई लढण्याचीच तयारी दर्शवल्याचं पाहिला मिळत आहे. यामुळे नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस येऊन देखील पाटील यांनी मैदानात उतरुन लढण्याची भाषा करायला सुरुवात केली आहे 

एकंदरितच केंद्रीय यंत्रणांचा वाढता फास असला तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढण्याचीच तयारी दर्शवल्याचं चित्र आहे. अशावेळी आगामी निवडणूका लढण्यासाठी आर्थिक गणितं जुळवताना पवार गटाला अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार गट शरण येणार की लढाई लढणार हे पाहावं लागेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget