एक्स्प्लोर

शरद पवार पीडित शेतकऱ्यांच्या बांधावर, तर रोहित पवारांवर लाखोंच्या गुलालाची बरसात

या मिरवणुकीसाठी जामखेड शहरातील मिरवणूक मार्गावर तब्बल 30 जेसीबी आणि 10 क्रेन आले होते. अहमदनगर रोडवरील विश्रामगृहापासून सुरू झालेली मिरवणूक तीन किलोमीटर वर असलेल्या बाजार समिती जवळ थांबली.

मुंबई : एकीकडे वयाच्या ऐंशीतही शरद पवार ओला दुष्काळामुळे पाहणी दौरा करत आहेत, तर दुसरीकडे नातू रोहित पवार मात्र विजयी मिरवणुकीत गुलाल उधळत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. संपूर्ण पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. काल सातारा दौरा केल्यानंतर आज शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. तिथे शेतकऱ्यांच्या भेटीगाठी करून त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर दुसरीकडे नातू रोहित पवारांची मात्र जामखेडमध्ये विजयी मिरवणूक झाली. यावेळी ढोल-ताशांचा गजरात 30 जेसीबी लावून गुलालाची उधळण करण्यात आली. विधानसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी नवनिर्वाचित आमदारांना ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहा, असा सल्ला दिला होता. या सल्ल्याचा विसर पवारांचे नातू रोहित पवारांनाच पडलेला दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीने गुलाल उधळून रोहित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. निवडून आल्यानंतर रोहित पवार आज पहिल्यांदा जामखेड शहरात आले होते. जनतेचं आभार मानण्यासाठी या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीसाठी जामखेड शहरातील मिरवणूक मार्गावर तब्बल 30 जेसीबी आणि 10 क्रेन आले होते. अहमदनगर रोडवरील विश्रामगृहापासून सुरू झालेली मिरवणूक तीन किलोमीटर वर असलेल्या बाजार समिती जवळ थांबली. गेल्या 30 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्या लढत झाली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे होतं. यात रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा 43 हजार मतांनी पराभव केला. बऱ्याच वर्षांनी या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार झाल्याने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. राज्यात इतका सत्तासंघर्ष सुरु असताना शरद पवार मात्र थेट बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांचे डोळे पुसले. उद्ध्वस्त शिवारांची पाहणी केली. त्याचवेळी त्यांचे नातू रोहित पवार गुलालात माखले होते.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget