एक्स्प्लोर

पवार शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहाचे नेते : प्रकाश आंबेडकर

''शरद पवार हे शेतकऱ्यांचे नाही, तर शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहाचे नेते आहेत,'' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुणे : भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ''शरद पवार हे शेतकऱ्यांचे नाही, तर शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहाचे नेते आहेत,'' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यासह देशभरात विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरु आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांना चिथावणारं वक्तव्य केलं. दिलेली आश्वासनं पाळण्याची सरकारची नियत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. शरद पवारांच्या या वक्तव्याचा प्रकाश आंबेडकरांनी समाचार घेतला. ''शेतकरी जातीवर मतदान करत राहील तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत. त्याला अन्नधान्य, शेतमाल फेकण्याशिवाय पर्याय नाही. जातीसाठी किती माती खायची हे शेतकऱ्यांनी आता ठरवलं पाहिजे,'' असं आंबेडकर म्हणाले. शरद पवार काय म्हणाले? “सामान्य माणसाला त्रास होईल, लोकांवर आघात होईल असं काही करु नये. पण हा संघर्ष प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, हा निकाल घ्यावा लागेल.  सरकारने दिलेली आश्वासन पाळली नाहीत,तशी त्यांची नियत दिसत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी असं आवाहन करतो”, असं पवार म्हणाले. मुनगंटीवार यांचं पवारांना प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं. ''इतके वर्षे सत्तेत असताना जनतेची कामं करता आले नाही. शेतकऱ्यांना चिथावण्यामागे पुन्हा सत्तेत जाण्याची घाई आहे असं दिसतं,'' असं म्हणत मुनगंटीवारांनी पवारांना उत्तर दिलं. ''शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांना आत्महत्या थांबवता आल्या नाही. आमचं सरकार योग्य मार्गाने निघालं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे, तेव्हा आपल्याला स्वत:च्या शेतावर जावं लागेल याची भीती पवारांना वाटत असावी,'' असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget