एक्स्प्लोर

Sharad Pawar Health | पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात यश, काही दिवसांनी होणार आणखी एक शस्त्रक्रिया : डॉ. मायदेव

शरद पवारांवर (Sharad Pawar ) येत्या काही दिवसांमध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, याविषयी निर्णय घेण्यात येईल. पण, तूर्तास मात्र शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांना मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.  मंगळवारी (30 मार्च) उशिरा रात्री पित्ताशयामध्ये (Gallbladder) अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली.

या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे. यासंदर्भात देखील डॉक्टर निर्णय घेणार आहेत. दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली आहे. 

शरद पवारांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी एक मोठा खडा अडकून बसला होता. ज्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे उद्या शस्त्रक्रिया करणं योग्य नव्हतं. त्यामुळे लगेच काही चाचण्या केल्यानंतर पित्तशयातील  तो खडा दुर्बिणीद्वारे काढण्यात आला. या शस्त्रक्रियेला अर्धा तास लागला, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली. दरम्यान, या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या यकृतावरील ताण कमी होणार आहे. त्याचसोबत त्यांना थोडी काविळ देखील झाली होती, ती देखील कमी होण्यास मदत होईल असं देखील ते म्हणालेत. 

दरम्यान, शरद पवारांच्या पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार झाल्याने शस्रक्रिया करत त्यांचे पित्ताशय काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील शस्रक्रिया कधी करायची हे नंतर ठरवलं जाणार आहे. शरद पवारांना त्यांची प्रकृती बघून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.  दोन ते तीन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सध्या शरद पवारांची तब्येत स्थिर आहे. 

गॉल ब्लॅडर स्टोन (Gallbladder Stone)  कसा होतो? 

गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय आणि यात खडे आढळल्यास त्याला गॉल ब्लॅडर स्टोन असे म्हणतात. यकृत म्हणजेच लिव्हरच्या खालच्या बाजूला पित्ताशय नावाची एक छोटी फुग्याच्या आकाराची पिशवी असते. जी जास्त तयार झालेलं पित्त साठवून ठेवण्याचं काम करत असते. आहारानंतर ठरावीक प्रमाणात पचनक्रियेसाठी पित्तरस लहान आतड्यात सोडला जात असतो. अतितेलकट पदार्थ खाल्ल्यास पित्तशयात छोटे छोटे खडे तयार होत असतात.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Mumbai Protest : ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले, शिवसेना भवनासमोर मुलीने पोलिसांची गाडी अडवली; मुंबईतील आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget