शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर घेणार राज ठाकरेंची भेट, EVM चा लढा तीव्र करण्याचे संकेत
Uttam Jankar : पुढच्या आठवड्यात मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे मत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांन व्यक्त केले.

Uttam Jankar : निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम फॅक्टर आहे, तो हेराफेरी करणारा आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल अनपेक्षित लागल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर, यांनी केले. याबाबत पुढच्या आठवड्यात मी राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे जानकर म्हणाले. राज ठाकरे यांना माझ्याकडील पुरावे दाखवले तर ते आणखीन या लढईत ताकतीने उतरतील असे जानकर म्हणाले. ईव्हीएमबाबतच्या लढ्यामुळं राज ठाकरेंना त्यांची पार्टी उभारण्यात मदत होईल असे जानकर म्हणाले. ईव्हीएमच्या लढ्यात मी राज ठाकरेंचे स्वागत करतो असेही जानकर म्हणाले.
ईव्हीएम मशीनने अनेक लोकांचा जीव घेतला
ईव्हीएम मशीनने अनेक लोकांचा जीव घेतला आहे. लोकांचा आक्रोश मांडण्यासाठी या ईव्हीएममध्ये दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे जानकर म्हणाले. मारकडवाडी संदर्भात मी राज ठाकरेंची भेट घेणार आहे. सोमवारी किंवा मंगळवारी ही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. मारकडवाडी प्रकरणासंदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत ते मी इलेक्शन कमिशनलाही दिले आहेत. 15 दिवसांची वेळ दिली असल्याचे जानकर म्हणाले.
ईव्हीएमच्या मुद्यावरुन आम्ही देशभर साखळी आंदोलन उभे करु
विधानसभेच्या निवडणुकीला चिठ्ठी पडण्याची वेळ वेगळी होती. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ज्या कक्षात सीसीटीव्ही लावले आहे. त्यातील पाच कक्षाचे सीसीटीव्ही देण्याची मी मागणी केली आहे असे जानकर म्हणाले. मारकडवाडी प्रकरणात जिल्हा प्रशासनाने पोलीस का घातले? असा सवालही जानकर यांनी केला. मारकडवाडी प्रकरणातील जनतेचा आक्रोश आहे तो निवडणूक आयोगाला जाणून घेता आला नाही. ईव्हीएमबाबत राजसाहेब असतील मनोज झा, राघव चड्डा, राहूल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अरविंद केजरीवाल साहेब यांना माहिती आहे. याबद्दल आम्ही काशीविश्वेश्वरापासून अयोध्या पर्यंत आम्ही सगळे साखळी आंदोलन उभे करु असे जानकर म्हणाले.
निवडणुकीतील पारदर्शकता आणल्याशिवाय उत्तमराव जानकर थांबणार नाही
निवडणुकीतील पारदर्शकता आणल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही असेही ते म्हणाले. राज्य सरकारने आमचा काय छळ करायचा ते करु द्या आम्ही शांत राहणार नाही असेही जानकर म्हणाले. मी किती मतांनी निवडून आलो आहे, हे दाखवण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. अन्यथा मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे असेही ते म्हणाले. बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरती मी आजही राजीनामे द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघाची निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या, हे मी सभापती आणि राज्य सरकारलाही सांगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
