एक्स्प्लोर
Advertisement
उस्मानाबादेतील बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा : पवार
उस्मानाबाद : उस्मानाबादमधील अल्पवयीन तरुणीवर पीएसआयने बलात्कार केल्याचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. कुठल्याही परिस्थितीत पीडित तरुणीची ओळख बाहेर पडू देऊ नये, यासाठी तिची आणि तिच्या नातलगांची भेट घेतली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.
सोयीस्कर हवामान नसल्यामुळे आम्हाला विमान वापरता आलं नाही. तरीही 9 तासांचा प्रवास करुन उस्मानाबादला आलो. मात्र कुठल्याही परिस्थितीत पीडित तरुणीची ओळख बाहेर पडू देऊ नये, यासाठी तिची आणि तिच्या नातलगांची भेट घेतली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. जर कोणी तसं करत असेल तर त्या संदर्भातले नियम कडकपणे पाळले पाहिजेत, असंही पवार म्हणाले.
शरद पवारांच्या तीन मागण्या :
पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी आणि प्रकरणाची महिला आयपीएसकडून चौकशी व्हावी या आमच्या तीन मागण्या असल्याचं पवारांनी सांगितलं.
गृहखात्यावर निगराणीची गरज :
ग्रामीण भागात शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या मनात अस्वस्थता पसरल्याचंही पवारांनी अधोरेखित केलं. अशा घटना ज्या परिसरात घडतात, त्या परिसरातल्या महाविद्यालयात दहशत पसरते. तो तणाव निवाळावा अशी आपली भूमिका असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. गृहखात्यावर निगराणी ठेवणाऱ्या योग्य व्यक्तीची आवश्यकता आहे, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली. आहेत ते कायदे पुरेसे असून यंत्रणेचा दरारा राहिला नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली.
आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन :
आमदाराच्या पगारवाढीचं शरद पवारांनी जोरदार समर्थन केलं आहे. जो खर्च आमदारांना करावा लागतो त्याच्या तुलनेत मिळणारा पैसा पुरेसा नाही. टीव्ही चॅनेलवर चर्चा करणाऱ्या अँकरचे पगार मला माहित आहेत, तिथे सुधारणेला वाव आहे, असा खोचक टोलाही पवारांनी लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement