एक्स्प्लोर

Sharad Pawar Health : शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल; उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया

Sharad Pawar Health : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पित्ताशयावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे.

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पित्ताशयावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. 

शरद पवार यांना 7 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता त्यानंतर 15 दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज दाखल करण्यात आले असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

3 एप्रिल रोजी शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यावेळी त्यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.  शरद पवारांवर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  30 मार्च रोजी पित्ताशयामध्ये (Gallbladder) अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली होती. या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे.  दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती. 

शरद पवारांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी एक मोठा खडा अडकून बसला होता. ज्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे उद्या शस्त्रक्रिया करणं योग्य नव्हतं. त्यामुळे लगेच काही चाचण्या केल्यानंतर पित्तशयातील  तो खडा दुर्बिणीद्वारे काढण्यात आला. या शस्त्रक्रियेला अर्धा तास लागला, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली होती. दरम्यान, या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या यकृतावरील ताण कमी होणार आहे. त्याचसोबत त्यांना थोडी काविळ देखील झाली होती, ती देखील कमी होण्यास मदत होईल असं देखील मायदेव यांनी सांगितलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 PM: 30 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special ReportPM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special ReportAkshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget