एक्स्प्लोर
अखेर शनी शिंगणापूरचं दार महिलांसाठीही खुलं
अहमदनगर : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शनी शिंगणापुरातील वादावर अखेर पडदा पडल्याची चिन्हं आहेत. कारण यापुढे शनी चौथऱ्यावर कोणालाही प्रवेश बंदी करणार नाही, अशी घोषणा मंदिर समितीच्या विश्वस्तांनी केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर विश्वस्तांनी हा निर्णय घेतला.
"यापुढे आम्ही कोणालाच चौथरा प्रवेशबंदी करणार नाही. आम्ही सगळ्यांनाच प्रवेशबंदी केली होती मात्र कावडीवाले गेले आहेत. त्यामुळे आता कोणालाही रोखणार नाही. तृप्ती देसाई आल्या तरीही त्यांना जाऊ देणार आहोत", असं विश्वस्तांनी सांगितलं.
दम्यान, पाडव्याच्या मुहुर्तावर आज शनी शिंगणापूरच्या विश्वस्तांचा विरोध डावलून शिंगणापूरमधल्या स्थानिकांनी चौथऱ्यावर प्रवेश केला.
पाडव्याच्या दिवशी शनीच्या शिळेवर गंगाजलाचा जलाभिषेक केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे. मात्र, यंदा महिला आंदोलनामुळे वाद पेटल्यानं मंदिर समितीनं ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला न जुमानता स्थानिकांनी चौथऱ्यावरुन प्रवेश करुन जलाभिषेक केला.
तिकडे पुरुषांनी चौथऱ्यावर प्रवेश केल्यास महिलाही चौथऱ्यावर जाणार, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यामुळे साहजिक यावरुन पुन्हा वादावादी होण्याची शक्यता होती. मात्र हा वाद टाळण्यासाठीच विश्वस्तांनी हा निर्णय घेतला.
दरम्यान, हायकोर्टाने जिथे पुरुषांना प्रवेश मिळतो, तिथे महिलांनाही प्रवेश मिळायलाच हवा, असं ठणकावून सांगितलं होतं. मात्र तरीही इथे महिलांना प्रवेश मिळत नव्हता. मात्र आज पाडव्याच्या निमित्ताने शनी शिंगणापूरात सिमोल्लंघन झालं आहे.
विद्या बाळ यांचा न्यायालयीन लढा
शनी शिंगणापूर वादाबाबत न्यायालयीन लढ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आलं.
हायकोर्टाने ठणकावलं
कायद्याने महिलांना कुठेही प्रवेश नाकारला जाऊ शकत नसताना शनि शिंगणापूरला महिलांना प्रवेश कसा नाकारला जातो? असा सवाल मुंबई उच्च न्यायालायने राज्य सरकारला विचारला होता. महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगत हायकोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरलं.
राज्य सरकारची भूमिका
दरम्यान, राज्य सरकारने जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे महिलांनाही प्रवेश मिळायला हवा, अशीच भूमिका घेतली होती. मात्र कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना, त्यामध्ये कमतरता दिसत होती.
तृप्ती देसाईंच्या भूमाता ब्रिगेडचा लढा
शनी मंदिरातील चौथरा प्रवेशासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा यांनीही लढा दिला. प्रत्यक्ष शिंगणापुरात जाऊन, महिलांसोबत त्यांनी चौथरा चढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावकऱ्यांच्या प्रचंड विरोधामुळे त्यांना यश येत नव्हतं.पण तरीही त्यांनी हिम्मत न हरता, आपला लढा चालूच ठेवला होता. यासाठी त्यांना अनेकवेळा धक्काबुक्की आणि पोलीस स्टेशनच्या वाऱ्याही करावा लागला होता.
काय होता शनी शिंगणापूर वाद?
शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. मात्र 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनीवर अभिषेक केला होता. महिलेने 400 वर्षांची परंपरा मोडित काढत शनिदेवाला अभिषेक केला.
या घटनेनंतर 7 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं.
महिला भक्ताने शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन त्याचं दर्शन घेत तेलाचा अभिषेक केल्याचं प्रकरण उघडकीस येताच शिंगणापूरसह राज्यभरात चांगलाच गदारोळ माजला. मात्र, तिने शनिदेवाचं दर्शन घेणं ही एका क्रांतीची नांदी असल्याचं सांगत सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला.
दुसरीकडे महिलेने थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळे ग्रामस्थांनी निषेध सभा घेतल्या. इतकंच नाही तर शनीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करुन शुद्धी करण्याचाही घाट घातला.
संबंधित बातम्या
शनीदेवाच्या दर्शनाला महिला, शनीशिंगणापुरात ग्रामस्थ संतप्त
महिलेकडून चौथऱ्यावर शनीची पूजा, एक्स्क्लुझिव्ह दृश्य 'माझा'च्या हाती
विद्या बाळ यांच्या लढ्याला यश, शनि मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
शनी शिंगणापूर वाद: मुख्यमंत्र्यांचा भूमाता रणरागिणी ब्रिगेडला पाठिंबा
आता अंबाबाई मंदिराच्या गाभारा प्रवेशासाठी महिला आक्रमक
शनिशिंगणापूर वाद: प्रवेशाआधी प्रथेचा विचार करा-शंकराचार्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement