एक्स्प्लोर

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की

धनगड जातीचे सात दाखले संभाजीनगरात काढले गेले होते. ते जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत. महसूल व सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक काढले होते.

Dhangar community : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की आली आहे. धनगर ऐवजी धनगड असं वाचावे असं शुद्धीपत्रक काढण्यात आले होते. धनगड हे आपल्या राज्यातच नाहीत, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे. त्यामुळे धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर जोरदार आक्षेप घेतला होता. धनगड जातीचे सात दाखले संभाजीनगरात काढले गेले होते. ते जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत. महसूल व सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक काढले होते. चुकीचे शुद्धीपत्रक काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धनगर समाजाने केली आहे. 

दरम्यान, धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या ‘सुधाकर शिंदे समिती’ने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जारी झालेली ‘धनगड’ प्रमाणपत्रे आदिवासी विभागाच्या जात पडताळणी समितीने रद्द केल्याने वाद वाढला होता. 

महायुती सरकारने सप्टेंबरमध्ये त्यासंदर्भात शिंदे समिती नेमली होती. समितीने सात राज्यांचे दौरा करून अभ्यास अहवाल तयार केला आहे. समितीमधील काही सदस्यांनी पूर्वीच वैयक्तिक अहवाल सुपूर्द केले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात खिल्लारे कुटुंबातील सहा सदस्यांनी धनगड जमातीची प्रमाणपत्रे मिळवली होती. ही प्रमाणपत्रे बोगस असून ती रद्द करावीत, अशी धनगर समाजाच्या आंदोलकांची मागणी होती. मात्र जात पडताळणी समितीला जात प्रमाणपत्रे रद्द करण्याचे अधिकार नसतात. अखेर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तसे अधिकार देण्यात आले आणि आज धनगड प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. धनगड जमातीची प्रमाणपत्रे काहींनी मिळवल्याने उच्च न्यायालयात आदिवासी आरक्षणासंदर्भातल्या खटल्यात पराभव झाला, असा धनगर आंदोलकांचा आरोप आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata Death: अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी  काय केलं?
अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी काय केलं?
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल 
5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल 
Harry Brook Triple Hundred At Multan : पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah pays tributes Ratan Tata : अमित शाहांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 10 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaRatan Tata Passed Away : उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata Death: अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी  काय केलं?
अलिबागच्या फार्म हाऊसवर उपचारासाठी आलेल्या डॉक्टरला कुत्रा कडकडून चावला, मग रतन टाटांनी काय केलं?
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल 
5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल 
Harry Brook Triple Hundred At Multan : पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
अशीही श्रद्धांजली... जो पुरस्कार प्रदान केला, त्या पुरस्कारालाच आता रतन टाटांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
अशीही श्रद्धांजली... जो पुरस्कार प्रदान केला, त्या पुरस्कारालाच आता रतन टाटांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
माझ्या आयुष्यातील ध्रुवतारा लुप्त झाला! रतन टाटांच्या निधनानंतर सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
Embed widget