Satara Bank Election : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणूकीत धक्कादायक निकाल लागला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणूकीत धक्कादायक निकाल लागला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांचा पराभव केला. मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजितसिंह पाटणकर यांचा 14 मतांनी विजय झालाय. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना 44 मते मिळाली तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 58 मते मिळाली आहेत. शंभूराज देसाई यांचा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिसेनेसह राष्ट्रवादीलाही सातारा दिल्हा बँक निवडणुकीत मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. कराड सोसायटी गटात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा विजय झालाय. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंह पाटील यांना 66 मते मिळाली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1964 मतदारांपैकी 1892 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 96.33 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जावळी आणि खटाव सोसायटीसाठी झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसलाय. बाळासाहेब पाटील यांचा विजय झालाय.
या जागा बिनविरोध -
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत 11 जागा बिनविरोध झाल्या. रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, अनिल देसाई, सुरेश बापू सावंत, लहुराज जाधव, आमदार मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे आणि शिवरुपराजे खर्डेकर यांचा समावेश आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha