एक्स्प्लोर

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीस श्रीमंत शाहू महाराजांचा नकार

58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत श्रीमंत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्यं केलं.

मुंबई : मराठा आरक्षणाप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मराठा समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रणं धाडली आहेत. मात्र या बैठकीला येण्यास श्रीमंत शाहू महाराजांनी नकार दिला आहे. सह्याद्रीवर बैठक मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मराठा समाजातील जेष्ठ विचारवंत, कलाकार, माजी न्यायाधीश, सनदी अधिकारी यांना हे निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक निश्चित करण्यात आली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीआधी मुख्यमंत्री या विचारवंतांशी सल्लामसलत करणार आहेत. शाहू महाराजांचा नकार मराठा आरक्षणपश्नी बोलावलेल्या बैठकीला जाण्यास कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराजांनी नकार दिला आहे. आरक्षणावर तोडगा काढणासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांसह इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांना निमंत्रण देण्यात आलं. मात्र मराठा आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर या तिघांनीही बैठकीस जाण्यास नकार दिला. श्रीमंत शाहू महाराज काय म्हणाले? 58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत श्रीमंत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्यं केलं. मुंबईत मराठा ठोक मोर्चाच्या समन्वयकांची बैठक आज आंदोलनाच्या 16 व्या दिवशी सकल मराठा ठोक मोर्चाच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. मुंबईत ही बैठक पार पडेल. यामध्ये मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. भाजपच्या सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक दरम्यान मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे विधानसभा आणि विधानपरिषदेचे सर्व आमदार उपस्थित असतील. जेलभरोला तरुणवर्गाचा प्रतिसाद मुंबईतल्या आझाद मैदानावर काल सार्वत्रिक जेलभरो आंदोलन करण्यात आलं. या जेलभरो आंदोलनात मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग सहभागी झाला होता. आंदोलकांनी आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. यानंतर आणि दुपारी 3 वाजता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दरम्यान, 9 ऑगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget