एक्स्प्लोर
आजोबा म्हणून वावरणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीकडून चिमुकलीसोबत अश्लील चाळे
कुटुंबातील विश्वासू व्यक्ती या नात्याने वावरणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीनेच चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलंय. शेजारी राहणाऱ्या एका सजग महिलेच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार समोर आला.

नागपूर : लहान मुलींच्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कुटुंबाचा अत्यंत विश्वासू आणि मुलीचा तथाकथित आजोबा या नात्याने वावरणाऱ्या एका 50 वर्षीय इसमाने सहा वर्षीय मुलीसोबत लैंगिक चाळे करत असतानाचं कृत्य एका दक्ष महिलेने चित्रित केलं. ती चित्रफीत पोलिसांकडे पाठवली आणि चित्रीकरण पाहिल्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांना संपर्क करत सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या चिमुकलीचे आई-वडील दोघेही कामानिमित्ताने दिवसभर घराबाहेर राहायचे. त्यामुळे ही चिमुकली शाळेतून घरी आल्यावर कधी-कधी तिच्या कुटुंबाच्या अत्यंत विश्वासातला आणि नेहमीच घरी ये जा करणारा 50 वर्षीय रमेश भिवगडे नावाचा इसम सातत्याने तिच्यासोबत खेळायचा. तो पीडित मुलीच्या वडिलांच्या लहानपणापासूनच घरी येत असल्याने पीडित मुलीच्या पालकांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि तो नेहमीच चिमुकलीला खेळवायचा.
मात्र, तिच्या पालकांच्या अनुपस्थितीत रमेश भिवगडे तिला घराच्या गच्चीवर नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा प्रकार जवळच्या इमारतीत राहणाऱ्या एका दक्ष महिलेच्या लक्षात आला. आजोबा या नात्याने ही व्यक्ती लहान मुलीसोबत नको ती चाळे करत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने सर्व प्रकार चित्रीत करत तो पुरावा म्हणून पोलिसांना दिला आणि हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
सुरुवातीला तर पीडित मुलीच्या पालकांना अनेक वर्षांपासून घरी येणारा रमेश असं कृत्य करू शकतो यावर विश्वास बसला नाही. मात्र जेव्हा पोलिसांनी पालकांना पुरावे दाखविले, त्यांनतर त्यांना धक्काच बसला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी रमेश भिवगडेवर लहान मुलांचा लैंगिक छळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक केली आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement



















