एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. ही मुलगी रुग्णालयात उपचार घेत होती. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं हे अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. 14 वर्षीय पीडित मुलगी एका अनाथालयाची विद्यार्थिनी आहे. मानसिक त्रास असल्याने गेले काही दिवस तिच्यावर नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरु होते.
नागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. ही मुलगी रुग्णालयात उपचार घेत होती. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं हे अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. 14 वर्षीय पीडित मुलगी एका अनाथालयाची विद्यार्थिनी आहे. मानसिक त्रास असल्याने गेले काही दिवस तिच्यावर नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरु होते.
20 जुलै रोजी अनाथालयातील शिक्षक मुलीला घेऊन जाण्यासाठी जेव्हा मनोरुग्णालयात आले. तेव्हा पिडित मुलीने रुग्णालयातील एका परिचराने तिच्या सोबत 14 जुलै रोजी अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार शिक्षकांकडे केली. त्यानंतर अनाथालयातील व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार दिली. सखोल तपास करत पोलिसांनी शुक्रवारी रात्री मानकापुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आरोपी परिचर लोकेश गंगाहेडेला अटक केली आहे.
या प्रकरणी आरोपी कर्मचाऱ्यावर बलात्कार, मारहाण आणि पॉक्सो कायद्यानुसार बालकांचे लैंगिक छळ असे वेगवेगळे गुन्हे नोंदवले आहेत. दरम्यान, प्रकरणाचा तपास सुरु असला तरीही सध्या या विषयावर भाष्य करता येणार नाही अशी भूमिका मनोरुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement