एक्स्प्लोर

Sheetal Amte | डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? सांगणाऱ्या शीतल आमटे; आत्महत्येनं महाराष्ट्रात खळबळ

डॉ. शीतल आमटे यांनी 'एबीपी माझा'साठी एक व्हिडीओ व्लॉग सीरिज केली होती. त्या व्हिडीओ व्लॉगच्या माध्यमातून आनंदवनाचं काम उलगडून दाखवण्याचं काम त्या करत होत्या.

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. शीतल आमटे यांनी 'एबीपी माझा'साठी एक व्हिडीओ व्लॉग सीरिज केली होती. त्या व्हिडीओ व्लॉगच्या माध्यमातून आनंदवनाचं काम उलगडून दाखवण्याचं काम त्या करत होत्या. तसेच त्यांनी आपल्या या व्हिडीओ सीरिजमार्फत अनेक सामाजिक आणि मानसिक विषय हाताळण्याचा आणि लोकांमध्ये त्यासंदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक हटके आणि वेगळे विषयही या सीरिजमधून हाताळले होते. महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशनमध्ये बाहेर कसं पडावं यावरही त्यांनी व्हिडीओ बनवला होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं वृत्त अतिशय धक्कादायक आहे.

डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं?, 'आनंदवना'तील कृत्रिमरित्या जंगल निर्मितीचा प्रयोग, महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या गोधडीच्या निर्मितीची कहाणी, मानव आणि कुत्रा यांची मैत्री! दोस्ती आपल्या कुत्र्यांशी, मुलांचे स्क्रीन अॅडिक्शन कसे सोडवावे? यांसारख्या विषयांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 'एबीपी माझा'साठी केलेल्या व्हिडीओ व्लॉग सीरिजमधून मांडले होते.

डॉ. शीतल आमटे यांच्या या व्लॉग सीरिजमधील काही व्लॉग :

Majha Vlog | डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? डॉ. शीतल आमटे यांची आर्ट थेरपी | ABP Majha

Majha Vlog | मुलांचे स्क्रीन अॅडिक्शन कसे सोडवावे ? डॉ. शीतल आमटे यांचा मोलाचा सल्ला | ABP Majha

VLOG Sheetal Amte | 'आनंदवना'तील कृत्रिमरित्या जंगल निर्मितीचा प्रयोग | ABP Majha VLOG Sheetal Amte | महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या गोधडीच्या निर्मितीची कहाणी | ABP Majha डॉ. शीतल आमटे | मानव आणि कुत्रा यांची मैत्री! दोस्ती आपल्या कुत्र्यांशी | VLOG Majha दरम्यान, डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरु असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे. महत्त्वाच्या बातम्या :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget