एक्स्प्लोर
राज्यभरात सर्व तर मुंबईत विनाअनुदानित शाळा बंद

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या शिक्षकांच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळा आणि कॉलेज आज बंद आहेत. शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून मुख्याध्यापक संघाने हे पाऊल उचललं आहे. राज्यभरात सर्व शाळा आणि कॉलेज बंद असले तरी मुंबईत मात्र फक्त विनाअनुदानित शाळा बंद असून अनुदानित शाळा सुरु आहेत. तर पुण्यातील बहुतांश शाळा आज सुरुच राहणार आहेत. दरम्यान, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शिक्षकांनी औरंगाबादेतील मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याला उत्तर म्हणून संतप्त शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलिस आणि शिक्षक जखमी झाले. शिवाय मुंबई पोलिसातील कर्मचारी राहुल कांबळे यांच्या या मोर्चादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांवर 307 चा गुन्हा का नाही? पोलिसांच्या लाठीहल्ल्यात शिक्षकांचेही डोकी फुटली आहेत, मग अशा पोलिसांवर 307 का दाखल होत नाही, असा सवाल शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला आहे. औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान झालेल्या शिक्षकांच्या राड्याप्रकरणी तब्बल 250 शिक्षकांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्षकांचा मोर्चा आक्रमक होत असताना, पोलिसांनी खबरदारीसाठी मोर्चाला अडवलं होतं. पण त्यानंतर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बीड
क्रीडा
व्यापार-उद्योग























