एक्स्प्लोर
शाळेचं गेट कोसळून पालघरमध्ये दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू
पालघर : शाळेचं लोखंडी गेट अंगावर पडून एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वाड्यात घडली आहे. पालघरच्या वाडा जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक 2 मध्ये शिकणारी विद्यार्थिनी मृत्यूमुखी पडली.
दुसरीत शिकणारी तन्वी धानवा ही मुलगी मधल्या सुट्टीत खेळत असताना शाळेचा लोखंडी गेट तिच्या अंगावर पडला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबतचे इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
दोघा जखमींना उपचारांसाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. निकृष्ट बांधकाम आणि शिक्षकांच्या हलगर्जीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement