सतीश भोसलेच्या कुटुंबाची मुंबईत धडक, वनविभागाच्या कारवाईवरून अजित पवारांची घेणार भेट, काय होणार चर्चा?
सतीश भोसले ची पत्नी तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांन भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आले आहेत

Mumbai: सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाने कारवाई केल्यानंतर त्याच्या घरात प्राण्यांचे मांस व शिकारीचे साहित्य सापडल्या प्रकरणी विभागाने काही दिवसांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसलेला ताब्यात घेतले होते . वन विभागाच्या अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या वकिलांनी केला होता .वनविभागाच्या जागेवर असणाऱ्या सतीश भोसले (Satish Bhosle) उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाने कारवाई केल्यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे .याच संदर्भात आज सतिश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक हे उपमुख्यमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांन भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आले आहेत . संध्याकाळी 4 वाजता अजित पवार (Ajit Pawar)पक्ष कार्यालयात आल्यावर त्यांच्यासोबत भेट घेणार असल्याचे माहिती त्यांनी दिलीय .(Mumbai NCP office)
उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेणार भेट
खोक्या भोसले आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे खोक्या भोसले आणि त्यांच्या नातेवाईकांच कुटुंब हे उघड्यावर आल आहे .या कारवाई च्या संदर्भात आणि पुनर्वसनाच्या प्रश्नसंदर्भात खोक्या भोसले यांची पत्नी तेजू भोसले आणि नातेवाईक हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पक्ष कार्यालयात आले आहेत .या अनुषंगाने खोक्या उर्फ सतीश भोसले याचं कुटुंब बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत .शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता .त्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती .दरम्यान वनविभागाच्या जागेवर असणारे सतीश भोसलेच घर वनविभागाने पाडलं होतं .या कारवाईनंतर त्याच्या घरात शिकारीचे साहित्य तसेच वन्य जीवाचे मांस आढळून आले होते .दरम्यान या सगळ्या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत वन विभागाच्या पथकाने खोक्या उर्फ सतीश भोसले ला मारहाण करत टॉर्चर केल्याचा आरोपही सतीश भोसलेच्या वकिलांनी केला होता . या सगळ्या प्रकरणावर आता सतीश भोसले ची पत्नी तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांन भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आले आहेत
कोण आहे सतिश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.
हेही वाचा:


















