एक्स्प्लोर
खंबाटकी घाटात टेम्पोला भीषण अपघात, 18 मजुरांचा मृत्यू
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाताना खंबाटकी बोगदा ओलांडून पुढे गेल्यानंतर नागमोडी वळणावर टेम्पोला अपघात झाला.
सातारा : साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला पुणे-बंगळुरु महामार्गावर खंबाटकी घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 18 मजुरांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.
मृत्युमुखी पडलेल्या मजुरांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने टेम्पोमधून जवळपास 32 मजूर प्रवास करत होते. खंबाटकी बोगदा ओलांडून पुढे गेल्यानंतर नागमोडी वळणावर टेम्पोला अपघात झाला.
अपघातामध्ये तब्बल 18 मजुरांना प्राण गमवावे लागले असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची भीषणता पाहून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खंबाटकी घाटातील वळण धोकादायक असल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली होती. या भागात यापूर्वीही काही अपघात घडले होते. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातात अनेकांचे बळी जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement