एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया, केनियाच्या धावपटूंचा दबदबा
इथिओपिया, केनियासह भारतातील सुमारे साडेआठ हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी फ्लॅगऑफ करुन स्पर्धेला सुरुवात केली.
सातारा : साताऱ्यात आज हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आंतराष्ट्रीय पुरुष गटात इथिओपियाच्या फिक्रू अबेरा दादी, महिला गटात केनियाच्या मरसी जेलीमो टूने बाजी मारली. तर भारतीय पुरुष गटात प्रल्हाद रामसिरंग धनवट आणि महिला गटात स्वाती गाढवे यांनी प्रथम स्थान पटकावलं.
इथिओपिया, केनियासह भारतातील सुमारे साडेआठ हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी फ्लॅगऑफ करुन स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते या देखील उपस्थित होत्या.
आंतराष्ट्रीय पुरुष विजेते
- फिक्रू अबेरा दादी (इथिओपिया)
- हिलरी किपटू किमोसोप (केनिया)
- फ्रिसीव अँसफ्वॉ बिकेले (इथिओपिया)
आंतराष्ट्रीय स्त्री स्पर्धक
- मरसी जेलीमो टू (केनिया)
- जिनेट अँडके अॅगटीव (इथिओपिया)
- झेईनेबा कासिम जेलीटो (इथिओपिया)
भारतीय पुरुष स्पर्धक
- प्रल्हाद रामसिरंग धनवट
- राहुल कुमार पाल
- आदिनाथ भोसले
भारतीय महिला स्पर्धक
- स्वाती गाढवे
- रेश्मा केवटे
- आरती देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement