Santosh Deshmukh Murder Case: धनंजय मुंडेंना टार्गेट करु नका, अन्यथा...; बबनराव तायवाडेंचा इशारा
Santosh Deshmukh Murder Case: ओबीसी म्हणुन धनंजय मुंडे यांना टार्गेट करु नये, अन्यथा आम्ही आंदोलन करु, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात फरार आरोपींना अटक व्हावी, यासाठी जनतेतून पोलिसांवर दबाव आहे. त्यातच, विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते मंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची आणि वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी करत आहेत. यादरम्यान ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट करु नये, असं म्हटलं आहे.
ओबीसी म्हणुन धनंजय मुंडे यांना टार्गेट करु नये, अन्यथा आम्ही आंदोलन करु, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. दोषी असेल तर धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी, पण आतापर्यंतच्या चौकशीत त्यांचं नाव कुठे आलं नाही, मग त्यांच्यावर रोष का?, असा सवालही बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केला आहे.
धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं आणि जीवनातून उठवण्याचं काम सुरु- बबनराव तायवाडे
दोषी नसताना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं आणि जीवनातून उठवण्याचं काम सुरु आहे. ते होऊ नये, असं बबनराव तायवाडे म्हणाले. तसेच बीड येथील सरपंच खुन प्रकरण निंदनीय, दोषींवर कठोर कारवाई व्हावी. पण यात ओबीसी मराठा वाद निर्माण होऊ नये. मराठा आणि ओबीसी दूरी निर्माण झाली होती, जी दूरी संपली होती. ती पोकळी पुन्हा निर्माण होऊ नये. बीड प्रकरणावरून ओबीसी जनता किंवा ओबीसी नेत्यांनी टार्गेट करु नये, असंही बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
सीआयडी पथक आज कोणाला चौकशीला बोलावणार?
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. सीआयडीचे एकूण नऊ पथक या प्रकरणांमध्ये तपास कामी काम करतात. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. तर वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी दोन महिलांची देखील काल सीआयडीच्या पथकाने चौकशी केली. आज देखील चौकशीचे हे सत्र सुरू राहणार असल्याची शक्यता आहे.
वाल्मीक कराड आज सरेंडर करणार?, VIDEO:
संबंधित बातमी:
प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा...; सुषमा अंधारेंच्या विधानाने चर्चांना उधाण