एक्स्प्लोर

सुरज चव्हाण छोटा मासा, आता मोठ्या माश्यांची वेळ येणार; शिरसाटांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Sanjay Shirsat : यंदाची संक्रात कुणावरी तरी पडणार असून, मोठ्या माश्यांची वेळ आली असल्याचे शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या शिवसेना सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी (Khichdi Scam Case) अटक करण्यात आली आहे. तर, सुरज चव्हाण छोटा मासा असून आणखी मोठे मासे बाकी आहेत. यंदाची संक्रात कुणावरी तरी पडणार असून, मोठ्या माश्यांची वेळ आली असल्याचे शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत. याचवेळी बोलतांना त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 

दरम्यान याबाबत बोलतांना शिरसाट म्हणाले की, "खिचडी प्रकरणात सुरज चव्हाणला काल अटक झाली, आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. खिचडी प्रकरण छोटे प्रकरण असलं तरीही, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक दिवसांच्या चौकश्या आणि त्याच्यानंतर केलेली ही कारवाई आहे. परंतु, सुरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे. मुख्य मासे आणखी बाजूला आहे. सुरज चव्हाण नावापुरता आहे, त्यांना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर सर्व नावं बाहेर येतील. खिचडी घोटाळ्यासह अनेक घाटाळे समोर आले. मुंबईत 26 अशी कंत्राटदार आहेत, जे कुणाच्यातरी इशाऱ्यावर कामं घेत होते. त्याच्याबद्दलचा देखील अहवाल आला आहे. एक नव्हे अनेक प्रकरण आता उघडकीस यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही संक्रात अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे. त्यामुळे छोटे मासे सोडून द्या, मोठ्या माशांचा देखील आता वेळ आला आहे," असे शिरसाट म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंवर टीका...

पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की,“सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना आदित्य ठाकरे कोणताही संबंध नसताना दावोसला गेले होते. त्यावेळी तीस-पस्तीस हजार कोटीचे काहीतरी करार केले होते. मात्र, पुढे त्या करारांचं काय झालं?, परंतु त्यानंतर मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत, त्याचे काम सुरू आहे. तसेच 4 लाख कोटींचा करार हे सुद्धा एक मोठं यश आहे. मात्र, हे लोकं टीका करत होते, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत आहे. परंतु, हे लोक टेंडरमध्ये आणि टक्केवारीत अडकलेली लोकं आहेत, असे शिरसाट म्हणाले.

पत्राचाळ प्रकरणात लवकरच कारवाई

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर एसीबीच्या पथकाने छापेमारी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, "त्यांनी काही केलं असेल तर कारवाई होईल, नसेल केले तर मोकळे राहतील. आरोपी कोणी असो आम्ही असो की ते कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. पत्राचाळ प्रकरणात सुनावणी सुरु असून, लवकरच तुमंच्यावर (संजय राऊत)  कारवाई होईल, असेही शिरसाट म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Suraj Chavan : आदित्य ठाकरेंना धक्का! सुरज चव्हाण यांना अटक, महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget