मुख्यमंत्री 40 येड्यांचा बळी द्यायला गुवाहाटीला गेले, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut: पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut: ज्या राष्ट्रमातेनं शिवजी महाराज दिला, त्या भूमीमध्ये गद्दाराची बिजे रोवली गेली आहेत. ती कायमची उखडून टाकण्यासाठी मशाली पेटलेल्या आहेत. बुलढाण्यात किती खोके आले? सगळ्यात जास्त खोके बुलढाण्यात आले आहेत. एक फूल दोन हाफ.. एक खासदार दोन आमदार... आज तिकडे गुवाहाटीमध्ये देवीला नवस बोलायला गेले... महाराष्ट्रातील देव काय संपले काय? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला. माँ जिजाऊ, रेणुकामाता मंदिर बुलढाण्यात असताना रेडे गुवाहाटीले गेले आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केलाय.
महाराष्ट्र संताचा आहे, ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले आणि मुख्यमंत्री 40 येड्यांचा बळी द्यायला गुवाहाटीला गेले, हे राज्याचं दुर्दैव आहे, असे संजय राऊत म्हणाले. एकही गद्दार पुन्हा निवडुन येणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि पक्षासाठी जन्मठेप झाली तरी चालेल. रेड्याचा राजकीय बळी घेतला तर आपण खरे शिवसैनिक आहोत. तुम्ही 40 नेले 40 लाख शिवसेनेकडे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
एकही खोकेवाला परत निवडून जाता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे. ना खासदार ना आमदार.. कुणालाही निवडून न देण्याची शपथ घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत? पाहा व्हिडीओ
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
संजय राऊत सारखा मर्द तुरूंगात जाऊन आले तरी सोबत आहेत. हे सगळे गद्दार, तोतये. यांचे कर्तृत्व शून्य. एका व्हिडिओत मुख्यमंत्री शेतीत रमले. शेतातला दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री. चिखल तुडवत जाणारे शेतकरी, कधीतरी डीपी जळते. हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जातो. तुम्ही ज्योतिष्याकडे जातो मग शेतकऱ्याने कुठे जायचे. तुमची सुबत्ता दाखवता मग शेतकरी उपाशी, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.
डीपी जळते, बीड पॅटर्न मविआने आणला. फडणवीसांचे जुने विधान ऐकवले. देवेंद्र जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना वीजबिल माफ करा. वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले किती लोकांना मिळाले चॅनलवाल्यांनी हे दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे. शिवसेना जिवंत सळसळत रक्त. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. मी तुमच्या भरवशावर आहे पण तुमच्या संकटात उभे राहण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करायची नाही. लंडनहून तलावार आणून होणार नाही ती पेलणार का? ती ताकद शेतकरी मावळ्यात. एकीकडे छत्रपतींचा अपमान करायचा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.