एक्स्प्लोर

Sanjay Raut: महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी काही आत्मे महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, संजय राऊतांचे PM मोदींना प्रत्युत्तर

Sanjay Raut: दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडलेली आहे .

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेचा (Lok Sabha 2024)  प्रचार सध्या मोदी (PM Modi)  विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar)  असा झाला आहे.  पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर  भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर प्रचार आणखी तापला आहे. महाराष्ट्राच्या प्रचारात मोदींच्या एका वक्तव्यानं राजकारण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  मोदींना प्रत्युत्तर देताना वखवखलेला आत्मा म्हटले आहे.  शिवसेना (Shiv Sena)  उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  देखील जहरी टीका केला आहे.  महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी  टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत त्याच्यावर अनेकांची, व्यापारांची वक्रदृष्टी कायम राहिलेली आहे ती आज सुद्धा आहे. महाराष्ट्रातच अखंडत्व आणि वैभव टिकवण्यासाठी ही लढाई पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत.  त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडलेली आहे . काहींचे भटकते आणि वकवकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत.  महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडत आहेत. महाराष्ट्र लुटला जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केला जात आहे. महराष्ट्राला  नामर्द करण्याची योजना आहे. लढवय्या महाराष्ट्राला आणि शिवसेना जोपर्यंत इकडे ठामपणे उभे आहे तोपर्यंत यांना ते शक्य नाही.म्हणून या लोकांनी शिवसेना तोडली,  शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला पण या वेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभे आणि लढत राहतील.

महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीच झुकला नाही: संजय राऊत 

संजय राऊत म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र कमजोर तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि 107 हुतात्मा यांचा स्मारक जे फोर्टला आहे हे सुद्धा पाहावे. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते याची दोन्ही प्रतीक आहेत . सध्याचा  महाराष्ट्र हा दिल्ली पुढे कधीच झुकला नाही हा इतिहास आहे. इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चिंतामणराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र झुकला नाही.

राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या: संजय राऊत 

 महाराष्ट्र आपल्या स्वाभिमानासाठी कायम लढत राहिला आहे.  सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत.  त्याला थैलीचे राजकारण म्हणतात.  मुंबईच्या लुटीचा मल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता विभागाची हे सध्याच्या राजकर्त्यांचे धोरण आहे, असेही संजय राऊत म्हणाले. 

2024 सरकार बदलेल तेव्हा अजित पवार पुन्हा दैवत बदलतील

संजय राऊतांनी अजित पवारांवर देखील टीका केली आहे.संजय राऊत म्हणाले.   आपण कोणाच्या चरणाची बसून हुजरेगिरी करत आहे,  त्याचे हे लक्षण आहे. आम्हाला त्यात पडायचं नाही मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना फडणवीस गट असेल किंवा राष्ट्रवादी फडणवीस गट असेल. अजित पवार यांनी दैवत बदलला आहे.  2024 ला सरकार बदलेल मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदलला असेल. 

हे ही वाचा :

Thane Lok Sabha Election 2024: महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, मुख्यमंत्र्याचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के रिंगणात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget