एक्स्प्लोर

परमबीर सिंह यांच्या पत्रावर संसदेत थयथयाट करणारे संजीव भटांच्या पत्रावर नाचणार का? खासदार संजय राऊतांचा भाजपला सवाल

पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावरुन सोमवारी संसदेत गोंधळ झाला. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावरुन काल ज्यांनी संसदेत थयथयाट केला ते आयपीएस संजीव भटांच्या पत्रावर नाचणार का असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला केलाय. नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणारे संजीव भटांचे पत्र भाजपने समोर आणावं आणि त्याचा तपास करावा असंही आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. 

काल संसदेत बोलताना भाजप नेत्यांनी महाराष्ट्तील सरकार बरखास्त करावं अशी मागणी केली होती. एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी आपल्या पत्रातून सरकार, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात असं सांगत भाजप नेत्यांनी संसदेत गोंधळ घातला होता.

खासदार संजय राऊत म्हणाले की, "ज्या एक पत्रावरून भाजपचे लोक थयथयाट करत आहेत त्यांनी गुजरातमधील आयपीएस संजीव भट यांनी लिहलेले पत्र जे नंतर उघड करावं. भाजपने त्या पत्राच्या आधारावर गुजरात सरकार का बरखास्त केलं नाही? काल जे थयथयाट करत होते ते हे पत्र आल्यावर आज नाचणार का?"

संजय राऊत पुढे म्हणाले की, "रविशंकर प्रसाद हे कायदा मंत्री आहेत. गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातच्या सरकारवर आरोप करणारे पत्र लिहिले होते. त्या आधारावर गुजरात सरकारच्या पूर्व मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली का? संजीव भट यांनी केलेले आरोप जास्त गंभीर होते. त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. गुजरातमध्ये एक न्याय आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय द्यायचा का?"

संजय राऊत म्हणाले की, "संजीव भट यांनी केलेल्या आरोपांबाबत तपास करावा अशी मागणी मी देशाच्या कायदा मंत्र्यांकडे करतो. काल लोकसभेत जे नाचत होते 
त्यांनी संजीव भट यांचं पत्र समोर आणावं आणि त्यावर कारवाईची मागणी करावी."

गुजरातमधील माजी पोलीस अधिकारी संजिव भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. 

मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्यात यावी यासाठी परमबीर सिंह यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, परमवीर सिंग कोर्टात गेले ही चांगली गोष्ट आहे. राज्यसभेत रंजन गोगाई आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टात न्याय मिळत नाही असं वक्तव्य केलं होतं. या दबावाचा वापर करून परमवीर सिंग यांना काम करून घ्यायचं असेल तर ते न्यायालयात जाऊ शकतात. ईडी, सीबीआय ,सुप्रीम कोर्ट यांचा राजकारणासाठी वापर केला जातो हे राजन गोगाई यांचं म्हणणं आहे, त्यांच्यावर मी विश्वास ठेवतो

परमवीर सिंग राज्य सरकारवर दबाव आणत असतील तर सरकारने त्याचा विचार करावा असंही संजय राऊत म्हणाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायचा आदेश दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्याना पत्र लिहलं होत. यावर गृहमंत्र्यांची खुर्ची जाणार की राहणार ही चर्चा सुरु होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट केलं.

खासदार संजय राऊत म्हणाले की, "राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फरक नाही. पवार साहेबांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याविषयी जी भूमिका मांडली ती सरकारची भूमिका आहे. अशा पांचट पत्रावरून गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचे राजीनामे घेतले तर कुणाही राज्य करु शकणार नाही. आमच्याकडे पण गुजरात मधील पत्र आहेत ती रविशंकर प्रसाद याना पाठवू."

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 06 OCT 2024 :  10 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget