एक्स्प्लोर

Sanjay Raut : ही मुंबई, आणि मुंबईचा दादा शिवसेना : संजय राऊत

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. राऊत यांनी दिल्लीमध्ये स्फोटक पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. राऊत यांनी दिल्लीमध्ये स्फोटक पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत. राऊतांनी पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांकडे ईडीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सरकार पाडण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आल्याचं पत्र राऊत यांनी उपराष्ट्रपतींना दिले आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे.

'ही मुंबई, आणि मुंबईचा दादा शिवसेना'
महाराष्ट्राच्या नेत्यांना अडकवण्यासाठी, तुरुंगात डांबण्यासाठी ईडी काम करतंय. अशा एजन्सीच्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही एफआयआर दाखल करणार आहोत. ईडीचे अधिकारी वसुलीचं काम करतात. त्यांचे एजंट बाहेर फिरतात. मुंबई पोलिसांनी ईडीची चौकशी करावी. ईडीचा नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत दादागिरी चालणार नाही. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

'ईडी कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेईन'
निष्पाप मुंबईकरांचा ईडीकडून छळ सुरु आहे. लवकरच ईडी कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेणार आहे. ईडीचे अधिकारी मविआ नेत्यांना घोटाळ्यात अडकवण्यासाठी कंत्राटदारांना गन पाईंटवर आमची नावं घेण्यासाठी धमकावत आहेत. भाजपचे नेते ईडीच्या कार्यालयात बसून असतात. मी लवकरच त्यांची नावं जाहीर करणार आहे. 

'सरकार पाडण्याची ऑफर नाकारली म्हणून...'
राऊत यांनी खळबळजनक दावा करताना म्हटले की, राज्यातील सरकार पाडत मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. ही ऑफर नाकारल्यानंतरच आपल्यावर ईडी कारवाईला सुरुवात झाली असा आरोप राऊतांनी केला आहे. 

'केंद्रीय तपासयंत्रणांचे घोटाळे पुराव्यानिशी सिद्ध करेन'
राऊतांनी हल्लाबोल करत म्हटलं आहे की, 'केंद्रीय तपास यंत्रणा क्रिमिनल सिंडिकेटचा भाग झाल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आर्थिक घोटाळे सुरु आहेत. विरोधक वारंवार सांगत आहेत की तुम्हाला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल. मात्र, त्याच कोठडीत आमच्या मागोमाग तुम्हालाही जावं लागेल.'

'तुम्हालाही त्याच कोठडीत घातल्याशिवाय राहणार नाही'
सरकार पाडण्यासाठी ईडीच्या मार्फत आम्हाला तुरुंगात घालण्याचा डाव आखत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आम्ही तुरुंगात गेलो तर त्याच कोठडीत तुम्हाला घातल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमचे गुन्हे आमच्यापेक्षा काळे आहात. तुमची पाप जास्त आहेत. आम्ही स्वच्छ आहोत, असं राऊत म्हणाले

'मला काय म्हणायचंय हे फडणवीसांना चांगलं कळतंय'
आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही. मी काय बोलतोय हे त्यांना नीट कळतंय. असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget