एक्स्प्लोर

Sanjay Raut : भाजपमध्येच सर्वात मोठं हवाला रॅकेट सुरू, सत्य लवकरचं येणार समोर; संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : भाजपमध्येच सर्वात मोठं हवाला रॅकेट सुरू, सत्य लवकरचं समोर येणार

Sanjay Raut : भाजपमध्येच सर्वात मोठं हवाला रॅकेट सुरू, सत्य लवकरचं समोर येणार असल्यांचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'एबीपी माझा' ला दिलेल्या मुलाखतीत आरोप केला आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने (ED) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान राऊतांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आणखी काय म्हणाले संजय राऊत?

देशातील न्यायालय दबावाखाली

किरीट सोमय्या हे सिरियल तक्रारदार असून आरोप करणं हेच सोमय्यांचं काम आहे. पण भाजपमध्ये सर्वात मोठं हवाला रॅकेट सुरू असून सत्य लवकरच समोर येईल असे सांगत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. देशातील न्यायालय दबावाखाली आहे, भाजप संबंधित प्रकरणावर अॅक्शन होत नाही. भाजपच्याच नेत्यांना न्यायलयाचा दिलासा का मिळतो? महाराष्ट्राला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे. ईडी या षडयंत्रातील एक पात्र आहे, हवेत आरोप करणाऱ्यांवर आम्ही का बोलावं? असा सवाल राऊतांनी केला आहे. भाजपचा पराभव हाच यावर तोडगा आहे, असे राऊत यावेळी म्हणाले. 

नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या हवाला किंगशी ठाकरे परिवारांचे संबंध

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे ईडीच्या रडारवर आल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहेत माहिती नाही, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. 

जप्त केलेली मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची

ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.

पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत कारवाई

ईडीने काल प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे.

काय आहेत आरोप?
चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Embed widget