एक्स्प्लोर
कोल्हापुरातील पराभवाला संजय मंडलिक जबाबदार, चंद्रकांत पाटील यांचा आरोप
आम्ही कोल्हापूरचा विकास केला मात्र आम्हाला मत नाही आणि ज्यांनी कोल्हापूर बकाल केलं त्यांना मतं मिळाली आहे. केवळ घोषणा करणाऱ्यांना मतं आणि काम करणाऱ्यांना नाकारणार का? असा सवाल देखील पाटील यांनी या वेळी केला.
कोल्हापूर : भाजप आणि सेनेला आलेल्या अपयशाचे खापर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर फोडले. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर आखड पाखड केली. संजय मंडलिक यांनी लोकसभेला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या मदतीचा पैरा फेडणार असल्याचे जाहीर केल्याने कोल्हापुरात महायुतीला अडचणी निर्माण झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपर्यंत महायुतीला राज्यातील सर्वच ठिकाणी खूप यश मिळाले. आता मात्र थोडी पिछेहाट झाली याचे आम्ही आत्मचिंतन करणार आहोत. आम्ही कोल्हापूरचा विकास केला मात्र आम्हाला मत नाही आणि ज्यांनी कोल्हापूर बकाल केलं त्यांना मतं मिळाली आहे. केवळ घोषणा करणाऱ्यांना मतं आणि काम करणाऱ्यांना नाकारणार का? असा सवाल देखील पाटील यांनी या वेळी केला.
मी कोथरूड वर अन्याय होऊ देणार नाही तसेच कोल्हापूरवरही अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगून या दोन्ही विभागाकडे लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांचा पराभव जिव्हारी लागला आहे. पक्ष त्यांची योग्य ती काळजी घेईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आतातरी evm वर विश्वास बसला का? की यांनीच इव्हीएम हॅक केले, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेला देण्यात आलेल्या प्रेसनोट मध्ये सगळे जग सुधारेल पण कोल्हापूरकर सुधारणार नाहीत असं वाक्य लिहिलं होतं, मात्र आपण ते बघितलेलं नाही जो मेसेज व्हाट्सअपला आला त्याचीच प्रिंट काढली. या वाक्याशी माझा काहीही संबंध नसल्याचा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement