सांगलीत पावसाचं थैमान! कृष्णेची पाणी पातळी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
गेल्या 3 दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणार संततधार पाऊस आणि कोयना धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोचली आहे. आयर्विन पुलावर 38 फूट पाणी पातळी पोहचली असून 40 फूट नदीची इशारा पातळी आहे. सध्या पावसाचा कमी झालेला जोर पाहता सांगलीत आयर्विन पूलाजवळ जास्तीत जास्त पाणी पातळी 41 फूट होऊन स्थिर होण्याची संभावना आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. सकाळी 9 वाजता कृष्णा नदीने 38 फुटांची पातळी ओलांडली आहे. तर पूर पट्टयातील शेकडो घरात नदीचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 200 हुन अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. तर संथ गतीने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे.
गेल्या 3 दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणार संततधार पाऊस आणि कोयना धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सोमवारी पाऊसाची जोर थोडा मंदावल्याने पातळीमध्ये होणारी वाढ संथ गतीने सुरु आहे. तर कोयना धरणातून 56 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी ही सकाळी 38 फूट झाली आहे. आणि संथ गतीने यामध्ये वाढ कायम आहे. तर पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे सांगलीच्या औदुंबर येथील दत्त मंदिर हे पाण्यात गेले आहे.
सांगली शहरातील पूर पट्ट्यात कृष्णेचे पाणी सोमवारीचे शिरले आहे. यामध्ये आज वाढ होऊन सुमारे 100 हुन अधिक घरांमध्ये पाणी घुसले आहे. याठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी काल पासूनच स्थलांतर सुरु केले होते. त्यामुळे सुमारे 200 हुन अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले असून वाढती पातळी आणि गत वर्षीच्या महापूराचा अनुभव लक्षात घेऊन नदी काठच्या नागरिकांनी स्थलांतर करण्यास आता मोठ्या संख्येने तयारी सुरु केली आहे. कृष्णेची इशारा पातळी 40 तर धोका पातळी 45 फूट आहे आणि सध्या सकाळी 9 वाजता नदीने आयर्विन पूल याठिकाणी 38 फुटांची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या काठी असणारे दोन्ही घाट हे पाण्याखाली जाऊन पाणीवरपर्यंत पोहचले आहे. तर अमर धाम स्मशानभूमीतही पाणी शिरले आहे. पूर पट्ट्यातील सुर्यवंशी प्लॉट, काका नगर, कर्नाळ रोड, साईनाथ कॉलनी याभागात पुराचे पाणी शिरले आहे.
पाहा व्हिडीओ : Sangli Rains | कृष्णा नदीची पातळी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; नागरिकांचं स्थलांतरण सुरु
प्रशासनाने पुरस्थिती लक्षात घेऊन सर्व आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवली असून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. चांदोली धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने धरणातील विसर्ग 14486 क्युसेक्स वरून12264 क्युसेक्स इतका कमी करण्यात आला आहे. तरीही पावसाची शक्यता असल्याने नदी काठच्या नागरिकांनी सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोयना धरणातील विसर्ग स्थिर असून त्यामध्ये सद्यस्थितीत कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही. आयर्विन पूल सांगली येथे उद्या जास्तीत जास्त पाणी पातळी 41'00" होऊन पाणी पातळी स्थिर होण्याची संभावना आहे. एकूणच पुढील 48 तासात जास्तीत जास्त 4-5 फूट वाढ होऊन पाणी पातळी स्थिर होऊन उतरायला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कृष्णेचं वाहून जाणारे पाणी आजपासून दुष्काळी भागात वळवणार, सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचणार पाणी
कोल्हापुरात पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली
कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी संध्याकाळी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. तेरा नद्यांवरील 95 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर 8 राज्य आणि 25 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. याचा परिणाम वाहतूकीवर झाला असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
धक्कादायक... गडचिरोलीत जंगलात झाडाखाली गरोदर मातेची प्रसूती, आरोग्यसेविकेमुळे वाचले प्राण