एक्स्प्लोर

कृष्णेचं वाहून जाणारे पाणी आजपासून दुष्काळी भागात वळवणार, सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचणार पाणी

कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी आजपासून दुष्काळी भागात वळवले जाणार आहे. कोयना धरणातून सातत्याने सुरु असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सांगली : कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी आजपासून दुष्काळी भागात वळवले जाणार आहे. कोयना धरणातून सातत्याने सुरु असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णेची पातळी 31.7 फुटावर पोहोचली आहे. 40 फुटांवर कृष्णेची इशारा पातळी आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णेतून वाहून जाणारे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी सिंचन योजनाना देण्याचा निर्णय घेण्यात जलसंपदा खात्याकडून घेण्यात आलाय. यानुसार टेंभू आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांतून कृष्णा नदीतील वाहून जाणारे पाणी उचलून तलाव, बंधारे भरण्यात येणार आहेत. म्हैसाळ योजनेतून आज सकाळपासूनच आणि टेंभू योजनेतून संध्याकाळपर्यंत पूर परिस्थिती दरम्यान वाहून जाणारे कृष्णा नदीतील अतिरीक्त वाहून जाणारे पाणी उचलून कायमस्वरुपी दुष्काळी भागात वळवले जाणार आहे. या पाण्यामुळं भागातील तलाव व बंधारे भरुन घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेतून कृष्णा नदीतील वाहून जाणारे पाणी उचलल्याने नदी काठची पूरपरिस्थिती कमी होणार नसली तरी पुराच्या काळात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला द्यावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती, ती मागणी आज पूर्ण होताना दिसत आहे. या पूर काळात या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अगदी सोलापूर जिल्ह्यापर्यंत हे पाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणचेही तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजना यावर्षी मार्च ते मे अखेर तीन महिन्यांसाठी उन्हाळी आवर्तना दरम्यान सुरु होती. पावसाचे आगमन झाल्यानंतर योजना बंद करण्यात आलेली होती. गतवर्षी कृष्णा नदीला पूर आलेला होता व अतिरीक्त पाणी वाहून गेले होते. त्याअनुषंगाने पूर परिस्थिती दरम्यान वाहून जाणारे अतिरीक्त पाणी म्हैसाळ योजनेद्वारे उचलून कायमस्वरुपी दुष्काळी भाग असलेल्या तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्याच्या लाभक्षेत्रातील तलाव व बंधारे भरुन घेतलेस पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचित केले होते. सद्यस्थितीत कृष्णा नदीला पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता म्हैसाळ योजना आजपासून कार्यान्वित करुन योजनेच्या लाभक्षेत्रातील कायमस्वरुपी दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव व बंधारे भरणेबाबत सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. यामध्ये साधारणपणे 2.50 टीएम.सी पाणी उचलून लाभक्षेत्रातील 30 मोठे तलाव, 50 पाझर तलाव व 50 बंधारे भरण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ही योजना आजपासून कार्यान्वित होत आहे. तर रात्रीपासून आशिया खंडातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळख असलेल्या टेंभू योजनेतून कडेगाव, खानापूर, आटपाडी या दुष्काळी भागातील तलाव, बंधारे भरले जाणार आहेत. या दोन्ही योजनाची जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही करणेसाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं

Embed widget