एक्स्प्लोर
'सांगली संस्थानच्या पटवर्धन राजांवर फौजदारी दाखल करा!'
सांगली संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन आणि तत्कालिन आयुक्त संजय देवगावकर यांच्याविरोधात फौजदारी दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. जलशुद्धीकरणासाठी जागा खरेदीत फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत महापौरांनी हे आदेश दिले आहेत.
सांगली : सांगली संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन आणि तत्कालिन आयुक्त संजय देवगावकर यांच्याविरोधात फौजदारी दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. जलशुद्धीकरणासाठी जागा खरेदीत फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत महापौरांनी हे आदेश दिले आहेत.
जलशुद्धीकरणासाठी 2013 मध्ये जागा खरेदी करण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव मंजूर केला होता. सोमवारच्या महासभेत नगररचना विभागाचे सहाय्यक संचालकांनी या जागा खरेदीचा प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालात महापालिकेने 3.85 हेक्टर जागा खरेदी केली केल्याचं नमुद करण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात शासकीय मोजणीनंतर 3.60 हेक्टरच जागा असल्याचं निदर्शनास आलं.
यावरुन महासभेत मोठा गोंधळ सुरु झाला. महापालिकेतील विष्णू माने, प्रशांत पाटील मजलेकर, माजी महापौर विवेक कांबळे, संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी महापालिकेची फसवणूक झाली असताना प्रशासन कशाची वाट पहात आहे? असा सवाल उपस्थित केला.
यानंतर महापौर हारुण शिकलगार यांनी जागा खरेदीत फसणूक केल्याचा ठपका ठेवत राजे विजयसिंह पटवर्धन आणि तत्कालीन आयुक्त संजय देगावकर या दोघांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, देगावकर हे सध्या मंत्रालयात कक्ष अधिकारी आहेत. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याचेही, महापौरांनी सांगितले. तसेच प्रकरणाच्या चौकशीसाठी उपायुक्त सुनील पवार व खासगी वकीलांची समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement