एक्स्प्लोर

जत तालुक्यातील अंतराळ गावच्या शेतकऱ्याचा नादखुळा, एकाच झाडावर 22 जातीच्या देशी/परदेशी आंब्याचे उत्पादन

जत तालुक्यातील अंतराळ गावच्या काकासाहेब सावंत शेतकऱ्याने एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या देशी/परदेशी आंब्याचे उत्पादन घेतले आहे.

सांगली : जत तालुक्यातील काकासाहेब सावंत या शेतकऱ्यांने एकाच आंब्याच्या झाडावर 22 प्रकारच्या जातीचे आंबे घेण्याची किमया साधलीय. यामध्ये केशर, हापुस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी अशा देशी आणि काही  विदेशी आंब्याच्या जाती समाविष्ट आहेत. एकाच झाडाला सावंत यांनी वेगवेगळ्या जातीची 44 कलम केली. यातील 22 जातीचे कलम लागू झाले आणि यंदा या एकाच झाडांच्या आंब्याला 22 प्रकारचे आंबे लगडले आहेत. यातील काही आंब्याचा तोडा झाला आहे. 22 जातीच्या मिळून जवळपास 700 आंबे लागले होते. काही जातीचे 4-4 डझन तर काही जातीचे 2-3 डझन आंबे लागलेत.

नोकरी सोडून नर्सरी व्यवसाय
पहिल्याच वर्षी या एकाच झाडावर 22 प्रकारच्या आंब्याचे जातीचे उत्पादन घेऊन सावंत यांनी आंबा शेतीत एक नवीन प्रयोग यशस्वी केलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग. याच तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती सुरू केली. नंतर शासनमान्य श्री बनशंकरी नावाने नर्सरी सुरू केली. या तालुक्यातील शेती निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. असे असतानाही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली. त्यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केलेला आहे. काकासाहेबांना आपल्या निर्णयाबद्दल समाधान वाटते. 

वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न 
त्यांचे कुटुंब आज नर्सरीच्या व्यवसायात चांगलेच स्थिरावले आहे. पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशक, काम केल्यानंतर काकासाहेब सावंत आता एक नर्सरी चालवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे करत असताना सावंत यांनी 3 वर्षांच्या आंब्याच्या झाडावर एक प्रयोग केला. 22 प्रकारच्या आंब्याची लागवड सावंत यांनी केली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात हा प्रयोग यशस्वी केला.   

सावंतांनी त्यांची शेती आंब्याची लागवड आणि बिगर आंब्याची लागवड अशा दोन गटात विभागली आहे. केशर या आंब्याची जातीची लागवड जवळपास 10 एकरांत करण्यात आली आहे. तर उर्वरित 10 एकरांमध्ये चिकू, डाळिंब, सीताफळ, हळद इत्यादींची लागवड केली जाते. सावंतांनी सरकारच्या विविध योजनांमधून सबसिडीचा लाभ घेत नर्सरी सुरू केली आहे. अनेक वर्षे सातत्याने मेहनत घेत आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करत त्यांनी यश मिळवले आहे. आता जत तालुक्यात आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. यावर्षी मोठी ऑर्डर काकासाहेब यांना मिळाली आहे. प्रत्येक रोप 40 ते 70 रुपयांना विकले जाते. 

दरवर्षी जवळफास 2 लाख आंब्याच्या रोपांची विक्री
सावंत दरवर्षी जवळफास 2 लाख आंब्याची रोपे विकतात. याव्यतिरिक्त ते एक लाख सीताफळे, जांभूळ, चिकू, लिंबू इत्यांदी फळांची रोपे विकतात. सावंतांच्या नर्सरीतून रोपे घेण्यासाठी परभणी, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव इत्यादी परिसरातून लोक येतात. यावर्षी त्यांना 4 लाख रोपांची ऑर्डर मिळाली आहे. मेकॅनिकची छोटीशी नोकरी करण्यापेक्षा स्वत:च व्यवसाय सुरू करून त्यातून मोठे यश कमावणारे काकासाहेब सावंत यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget