Sangli Flood | महापुरात माणुसकी मेली; घर सोडलेल्या पुरग्रस्तांच्या घरांवर चोरांचा डल्ला
सांगली शहर आणि परिसरात अजूनही पुराची स्थिती भीषण आहे. हजारो घरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान प्रशासनसमोर आहे. तीन दिवसांपासून सांगतील पूर असल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत.

सांगली : सांगलीत एकीकडे पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूर परिस्थितीमुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीतही चोरांनी पुरामुळे घर सोडून गेलेल्या घरांवर डल्ला मारला आहे.
सांगलीत महापुरात अनेक घरं पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक घर सोडून सुरक्षितस्थळी रवाना झाले. या गंभीर परिस्थितीतही संधी साधत चोरट्यांनी डाव साधला आणि घरातील टीव्ही, फ्रिज यासारख्या अनेक वस्तू लांबवल्याचं समोर आलं आहे.
सांगली शहर आणि परिसरात अजूनही पुराची स्थिती भीषण आहे. हजारो घरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान प्रशासनसमोर आहे. तीन दिवसांपासून सांगतील पूर असल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. पुरामुळे अद्यापही हजारो लोक घरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापर्यंत मदतकार्य पोहोचत नाही. घरात वीज नाही, भाजीपाला किंवा दूध नाही. अशा स्थितीत जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत. तीन दिवसांपासून ही स्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराची पाहणी करणार आहेत.
सांगली शहरातील राणा प्रताप चौक, कॉलेज कॉर्नर परिसरात कमरेएवढं पाणी साचलं आहे. शिवाय तिकडे भिलवडी आणि आजूबाजूची गावं पाण्यात अडकली आहेत. तिकडे जवळपास 300 ते 500 लोक अडकल्याची शक्यता आहे. NDRFच्या टीमला देखील मदतकार्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे. बाभळीचे काटे आणि पाण्याखाली अडथळ्यांमुळे NDRFच्या बोटी पंक्चर होत आहेत. त्यामुळे पत्र्याच्या नेव्ही बोट्सची मागणी होत आहे.
संबंधित बातम्या
- Sangli Rain | पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटली, 16 जणांचा मृत्यू, 12 मृतदेह हाती
- Maharashtra Flood : मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी, सांगली दौरा रद्द, सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
- महापूर नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी द्या : शरद पवार
- 'बाबांना बाहेर काढा, तरच मी जाणार', कोल्हापुरात रेस्क्यू ऑपरेशनमध्ये चिमुकलीचा टाहो
- अस्मानी संकटानंतर रोगराईची भीती, नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?























