एक्स्प्लोर
वडिलांच्या मृत्यूच्या भीतीने मुलाची आत्महत्या, पित्यानेही प्राण सोडले
एकाच दिवशी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने सांगलीतील वायचळ कुटुंबीयांवर अक्षरश दुःखाचा डोंगर कोसळला
सांगली : अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या वडिलांच्या चिंतेने व्यथित झालेल्या एका मुलाने आत्महत्या केली. त्यानंतर काही वेळातच वडिलांचाही हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सांगलीमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सांगलीच्या वारणाली भागात राहणाऱ्या 30 वर्षांच्या आशिष दिलीप वायचळ याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिषचे वडील दिलीप वायचळ यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दिलीप वायचळ यांच्यावर उपचार सुरु होते. वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने काळजीपोटी व्यथित होऊन आशिषने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला.
या घटनेमुळे वायचळ कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. या घटनेतून वायचळ कुटुंब सावरलं नसतानाच दिलीप वायचळ यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आशिषचे वडील दिलीप वायचळ यांचीही प्राणज्योत मालवली.
एकाच दिवशी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने वायचळ कुटुंबीयांवर अक्षरश दुःखाचा डोंगर कोसळला तर वारणाली परिसरावर शोककळा पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement