एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात गोंधळ, कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार
भिडे यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये. त्यांना जिल्हाबंदी करावी अशी मागणी या संघटनांनी केली होती. दरम्यान कार्यक्रमा आधी विरोध करणाऱ्या संघटनांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी लाठीमार केला. शिवप्रतिष्ठानच्या 32 मन सुवर्णसिंहासनासाठी निधी संकलन तसेच आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संभाजी भिडे हे जालन्यात आले होते.
जालना : जालन्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या वतीने आयोजित शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि काही अनुसूचित जातींच्या संघटनांनी गोंधळ घातला. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांची बैठक होती. कार्यक्रमस्थळी विरोध करणारे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील संभाजी भिडे यांच्या नियोजित कार्यक्रमाविषयी माहिती सोशल मीडियावरून फिरत होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि काही संघटनांचा या कार्यक्रमाला कडाडून विरोध होता. सकाळी कार्यक्रमस्थळी या संघटना आल्या आणि त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोंधळानंतर भिडेंचा नियोजित कार्यक्रम पार पडला. घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
भिडे यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये. त्यांना जिल्हाबंदी करावी अशी मागणी या संघटनांनी केली होती. दरम्यान कार्यक्रमा अगोदर विरोध करणाऱ्या संघटनांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी लाठीमार केला. शिवप्रतिष्ठानच्या 32 मन सुवर्णसिंहासनासाठी निधी संकलन तसेच आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संभाजी भिडे हे जालन्यात आले होते.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement