एक्स्प्लोर
पोलादी कुस्ती पाहण्यासाठी भिडे गुरुजी सांगलीच्या मैदानात उपस्थित
सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर लोखंडी पिंजऱ्यातील कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही कुस्ती पाहण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून कुस्तीप्रेमीसह शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपस्थित आहेत.
सांगली : सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर लोखंडी पिंजऱ्यातील कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही कुस्ती पाहण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून कुस्तीप्रेमीसह शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हजेरी लावली.
यंदाचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंग यांच्यामध्ये थोड्याच वेळात ही पोलादी कुस्ती होणार आहे. या कुस्तीसाठी सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर लोखंडी पिंजऱ्यात मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे.
ही कुस्ती पाहण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून कुस्तीप्रेमी सांगलीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी देखील कुस्तीप्रेमी असल्याने, त्यांनी देखील ही कुस्ती पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावली.
महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांच्या संकल्पनेतून आज (18 जानेवारी) सांगलीत पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेची स्थापना होत आहे. यानिमित्त पोलादी कुस्तीचं आयोजन केलं आहे.
स्वातंत्र्याआधी भारतात लोखंडी पिंजऱ्यात निकाली कुस्ती खेळण्याची पद्धत रूढ होती. पण स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणारी ही पहिलीच कुस्ती ठरणार आहे. त्यामुळे ही कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement