एक्स्प्लोर

'आमची दुकानं बंद, सरकार, कसं भागवायचं?' म्हणत उस्मानाबादमध्ये सलून चालकाची आत्महत्या

आर्थिक अडचणीला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील सांजा या गावातील सलून चालकाने विष घेऊन आत्महत्या केली आहे. मनोज दगडू झेंडे (45) असे आत्महत्या केलेल्या कटिंग दुकानदाराचे नाव आहे.

उस्मानाबाद :  आर्थिक अडचणीला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील सांजा या गावातील सलून चालकाने विष घेऊन आत्महत्या केली आहे. मनोज दगडू झेंडे (45) असे आत्महत्या केलेल्या कटिंग दुकानदाराचे नाव आहे.  'आमची दुकाने बंद आहेत , सरकारचा चुकीचा निर्णय आहे, माझ्या लहान लेकरांचे मी 5 हजार रुपयात कसे भागवायचे,' अशी चिठ्ठी झेंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली आहे. 

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात 2 मुले व एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. मुलीचे लग्न झाले आहेत तर एक मुलगा 17 वर्ष तर दुसरा 12 वर्षांचा आहे. झेंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नेमकं काय लिहिले आहे चिट्ठीत?

केसकर्तनालयाच्या दुकान मालकाने  आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिली असून, या चिट्ठीत त्यांनी लिहिले आहे की, मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे. दरम्यान, त्यांनी चिट्ठीत मी कोरोनाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. असं देखील म्हटलं आहे. आमची दुकाने बंद आहेत, आम्ही 5 हजार रुपयावर घर कसे चालवायचे असं देखील मनोज झेंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठीत लिहिले आहे. मनोज झेंडे यांनी विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपविले आहे.

शासनाने आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी
मनोज झेंडे यांच्या आत्म्हत्येनंतर नाव्ही समाजातील सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी यांनी देखील आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने केसकर्तनालयाचे दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत, त्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे, असं म्हटलं आहे. याचा पहिला बळी उस्मानाबाद जिल्ह्यात गेला आहे. एकतर शासनाने आम्हाला कुठलीही मदत केलेली नाही. आमचा उदरनिर्वाह फक्त केसकर्तनालयाच्या दुकानावर आहे. मुलांचे शिक्षण आणि घरभाडे आणि दुकानभाडे हे कुठून द्यायचे असा सवाल सचिन चौधरी यांनी उपस्थित केला आहे. एकतर शासनाने आम्हाला दुकाने उघडायची परवानगी द्यावी नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. रोज रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बर असं देखील त्यानी म्हटलं आहे.

गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रकोप सर्वत्र आहे. कोरोनामुळं अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद पडले. त्यात लॉकडाऊनने तर अनेकांचे कंबरडे मोडले. छोट्या व्यावसायिकांवर तर उपासमारीची वेळ आली. यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.  सरकारनं जाहिर केलेल्या लॉकडाऊनमध्ये नाभिक बांधवांचे व्यवसाय बंद पडले. उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही सरकारला वारंवार निवेदनं दिली मात्र आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. अशात अशा घटना घडत आहेत, त्यामुळं आम्ही सरकारचा निषेध करतो, असं महाराष्ट्र नाभिक महामंडळानं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde On Maharashtra School: शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Bhandara News: ग्रामसभेत मुद्दा मांडण्यासाठी हातात माईक घेताच पोलीस पाटील महिलेला विजेचा जबर धक्का बसला; अन् क्षणात...; भंडाऱ्याच्या निमगाव पागोरा गावातील थरारक घटना
ग्रामसभेत मुद्दा मांडण्यासाठी हातात माईक घेताच पोलीस पाटील महिलेला विजेचा जबर धक्का बसला; अन् क्षणात...; भंडाऱ्याच्या निमगाव पागोरा गावातील थरारक घटना
Chandrapur Crime News: शाळेच्या भिंतीवर मजकूर लिहिला, मुख्याध्यापकांची आई-वडिलांकडे तक्रार; चंद्रपूरमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल
शाळेच्या भिंतीवर मजकूर लिहिला, मुख्याध्यापकांची आई-वडिलांकडे तक्रार; चंद्रपूरमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Embed widget