एक्स्प्लोर
काँग्रेसच्या हाताला वीरपत्नीची साथ, साजिया शेख रिंगणात
![काँग्रेसच्या हाताला वीरपत्नीची साथ, साजिया शेख रिंगणात Sajiya Shaikh Wife Of Martyr From Solapur To Contest Election काँग्रेसच्या हाताला वीरपत्नीची साथ, साजिया शेख रिंगणात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/05082744/Solapur-Sajiya-Shaikh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं वातावरण तापताना दिसत आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या गर्दीत एक चेहरा मात्र लक्षवेधी ठरला आहे. वीरपत्नी साजिया शेख महापालिकेची निवडणूक लढत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या साजिया शेख यांच्याकडे मतदारांच लक्ष लागलं आहे. त्याचं कारण म्हणजे साजिया शेख या वीरपत्नी आहे.
पाच वर्षांपूर्वी सीमेवर लढताना वीरमरण आलेल्या शहीद मोहसीन शेख यांची ती पत्नी आहे. पतीने देशासाठी प्राणाची आहुती दिली, आपण किमान जनतेची सेवा करु या उदात्त भावनेने साजिया शेख मनपा निवडणूक लढवत आहे.
दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)