एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुरुपौर्णिमा काळात शिर्डीतील साईचरणी साडेसहा कोटींचं दान
गुरुपौर्णिमा उत्सव काळात साईबाबांच्या चरणी भक्तांकडून एकूण सहा कोटी 66 लाख रुपयांचं दान जमा झालं आहे.
शिर्डी : गुरुपौर्णिमा उत्सव काळात साईबाबांच्या चरणी भक्तांकडून कोट्यवधींची गुरुदक्षिणा देण्यात आली. चार दिवसांमध्ये एकूण सहा कोटी 66 लाख रुपयांचं दान जमा झालं आहे.
चार दिवसांमध्ये साई मंदिराच्या दक्षिणा पेटीत 3 कोटी 84 लाख रुपयांचं दान मिळालं. तर देणगी काउंटरवर एक कोटी 57 लाख रुपये देण्यात आले आहेत. ऑनलाईन ट्रान्सफर, चेक, डीडी याद्वारे जवळपास एक कोटी रुपये जमा झाले आहेत.
साडेअकरा लाख रुपये किमतीचं 439 ग्रॅम सोनं, तर दोन लाख 30 हजारांची साडेनऊ किलो चांदी साईचरणी दान करण्यात आली.
विशेष म्हणजे 14 देशांचं 11 लाख 25 हजार रुपये किमतीचं परकीय चलनही दानपेटीत जमा झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल एक कोटी रुपयांचं अधिक दान साईचरणी आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement