एक्स्प्लोर

'केतकी चितळेचा मला अभिमान आहे', सदाभाऊ खोतांकडून केतकीचं समर्थन

Sadabhau Khot On Ketaki Chitale : आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. केतकीचा मला अभिमान आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी तिचं समर्थनं केलं आहे.

Sadabhau Khot On Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपमधील काही नेत्यांनीही तिला समज दिली आहे. अशात आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. केतकीचा मला अभिमान आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी तिचं समर्थनं केलं आहे. केतकी चितळेनं शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर तिच्या अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. यानंतर तिला अटक करण्यात आली असून सध्या ती पोलिस कोठडीत आहे. 

सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे की, केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं ते म्हणाले. स्वतःवर टीका केली की सगळे आठवते. सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? असा सवालही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली त्यावेळी नैतिकता कुठे होती. अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करताच त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? असंही खोत म्हणाले.

प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांवर अन्याय केला 

प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांवर अन्याय केला आहे आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा आहे, असं खोत म्हणाले.  राजकारणाच्या आखाड्यात देवदेवतांवर आरोप प्रत्यारोप या राज्यामध्ये पहिल्यांदा होत आहेत.  जुन्या गोष्टी उकरून काढून ब्राम्हण समाजाला टार्गेट करायचं आणि बहुजन समाजाची सहानुभुती मिळवायची असं सुरु आहे, असं ते म्हणाले.  देव देवतांबाबत भावना व्यक्त केल्या तर त्यांना जातीयवादी ठरवल जातं आणि दुसऱ्या बाजूने राज्याचे ज्येष्ठ नेते हे ज्यावेळी हिंदू देव देवतावर बोलतात त्यावेळी कौतुक केलं जातं. औरंगजेबाच्या बाबतीत तुमच्या जिभेला लगाम बसतो, असं ते म्हणाले. 

सरकारने माझ्या जेलवारीची तयारी केली आहे
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. सरकारने माझ्या जेलवारीची तयारी केली आहे, कालांतराने माझ्यावर गुन्हे दाखल होतील परंतु त्याची भीती मला नाही. शकुनी मामांनी सतरंजीवर चाली टाकलेल्या आहेत. जनतेच्या बाजूने बोलल्यानंतर सरकार आवाज दाबते आहे अशी टीका खोत यांनी केली आहे. खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांना श्रीकृष्णाची उपमा दिली. सरकार कट कारस्थान करणारे कौरवाची फौज आहे. कंसाचा वध करायला श्रीकृष्ण रुपी देवेंद्र फडणवीस जन्माला आले आहेत. तुमच्या बापांचा बाप देवेंद्र फडणवीस आहेत.सरकार माझी जेलवारी करण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. त्यांनी मला काही फरक पडणार नाही. 20 मे च्या सभेत सरकारचे षडयंत्र उघडे करणार, त्यानंतर ते मला अडकवणार हे नक्की, असे खोत म्हणाले.

संबंधित बातम्या :

Raj Thackeray : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले, म्हणाले...

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन

 
मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget