एक्स्प्लोर

जवानांच्या प्रश्नांवरुन खोत-पडळकर यांनी इस्लामपूरच्या प्रांताधिकाऱ्याला धारेवर धरले

जवानांच्या प्रश्नांवरुन आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी इस्लामपूरचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी प्रांताधिकाऱ्यासोबत खोत आणि पडळकर यांची शाब्दिक चकमक झाली.

सांगली : जवानांच्या प्रश्नांवरुन आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी इस्लामपूरच्या प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरले. खोत आणि पडळकर यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी प्रांताधिकाऱ्यांसोबत खोत आणि पडळकर यांची शाब्दिक बाचाबाची झाली.

देशसेवा करुन निवृत्त झालेल्या आणि सेवेत कार्यरत असणाऱ्या वाळवा तालुक्यातील साखराळे येथील चार कुटुंबातील सैनिकांनी 26 जानेवारीपासून इस्लामपूरच्या प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. या सैनिकांना गावठाणमधून महाराष्ट्र शासनाकडून प्लॉट मंजूर झाले होते. ते इस्लामपूर प्रांताधीकारी यांनी रद्द केले. हे प्लॉट परत मिळावेत यासाठी या सैनिकांनी त्यांच्या कुटुंबासह इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. साखराळे गावातील गावठाण जागेतील जवानांना मंजूर झालेले प्लॉट राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने प्रांताधिकाऱ्यांनी रद्द केले असा आरोप करत जवान आपल्या कुटुंबासह आंदोलनाला बसले आहेत.

जय जवान, जय किसान अशी आपण घोषणा देतो, पण आपण काम कुणाचे करतोय. या माजी सैनिकांना त्यची जागा का दिली जात नाही, अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत. हे सैनिकांचे प्लॉट जवानांच्या कुटुंबाकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना द्यायचे आहेत का असा थेट प्रांताधिकारी याना सवाल करत पडळकर यांनी इस्लामपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले.

दरम्यान सैनिकांना आपल्या हक्काच्या जागेसाठी उपोषणाला बसावे लागते हे दुर्दैवी असल्याचे म्हणत विधानपरिषदेच्या दोन्ही आमदारांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका केली.

दुसरीकडे जवान त्याच्या कुटुंबासह इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर प्लॉट परत मिळवण्यासाठी बसले आहेत. सचिन पवार, गणेश मोकरे, सुभाष शिंदे, महेश उथळे या चार सैनिकांनी हे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला आमदारांनी पाठबळ दिल्याने हा प्रश्न लवकर सुटेल, अशी आशा सैनिकाना वाटते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थिनींना नोटबूक तपासण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि अश्लील व्हिडीओ दाखवायचा, भिवंडी महापालिका शाळेच्या शिक्षकाला बेड्या

नादच खुळा... योगी सरकारची लाडका युट्यूबर योजना, महिन्याला 8 लाख रुपये कमावण्याची संधी

मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन

Sugar Factory : निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Center : आदित्य ठाकरे निलेश राणे आमने-सामने! भाजप नेते प्रमोद जठार काय म्हणाले?Zero Hour Guest Center :  राजकोट किल्ल्यावर जे घडलं त्याला गृहखातं जबाबदार! वैभव नाईकांचा आरोपZero Hour Mhada : म्हाडाकडून काही घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्के कपातZero Hour on Rajkot Fort Rada : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नारायण राणेंची पाठराखण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थिनींना नोटबूक तपासण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि अश्लील व्हिडीओ दाखवायचा, भिवंडी महापालिका शाळेच्या शिक्षकाला बेड्या
विद्यार्थिनींना नोटबूक तपासण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि अश्लील व्हिडीओ दाखवायचा, भिवंडी महापालिका शाळेच्या शिक्षकाला बेड्या
नादच खुळा... योगी सरकारची लाडका युट्यूबर योजना, महिन्याला 8 लाख रुपये कमावण्याची संधी
नादच खुळा... योगी सरकारची लाडका युट्यूबर योजना, महिन्याला 8 लाख रुपये कमावण्याची संधी
मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन
मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन
Sugar Factory : निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर,  370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त

नितीन गडकरींनी मैदानात उतरावं; विधानसभेसाठी सक्रिय भूमिका बजावावी, RSS आग्रही

Video : अजित दादांना ताईंचा दे धक्का?; राष्ट्रवादीचा आमदार थेट सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये

तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव

Embed widget