(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Tendulkar: ‘स्वच्छ मुख अभियाना’चा स्माईल अॅम्बेसिडर म्हणून सचिन तेंडुलकरची नियुक्ती
सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानाचा (Swachh Mukh Abhiyan) 'स्माईल अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Sachin Tendulkar: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्वच्छ मुख अभियानासाठी SMILE AMBASSADOR म्हणून भारतरत्न श्री.सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) नियुक्ती करण्यासंदर्भात आज (30 मे) सामंजस्य करार करण्यात आला आहे. स्वच्छ मुख अभियान हे एक ओरल हेल्थ मिशन आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा सचिन हा सदिच्छा दूत झाला आहे.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानाचा 'स्माईल अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि सचिन तेंडूलकरनं आज स्वच्छ मुख अभियानासाठी सामंजस्य करार केला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले,"आमचे वैद्यकीय शिक्षण विभाग हे स्वच्छ मुख अभियान राबवत आहेत. हे अभियान तोंडाच्या आरोग्यासंबंधित आहे. सचिन तेंडुलकर आणि स्वच्छ मुख अभियान, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये आज सामंजस्य करार झाला आहे. अनेक मोठे सेलिब्रिटी कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या तंबाखूच्या जाहिराती करतात. सचिन यांनी अशा कोणत्याही जाहिरातीमध्ये काम केलं नाही. तरुणांमध्ये जनजागृती करण्याचे त्यांनी ठरवले आहे."
#WATCH | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, "...Our Medical Education Dept runs Swachh Mukh Abhiyan - an oral health mission. For the next 5 years, Sachin Tendulkar will promote oral health as its brand ambassador. When several big celebrities promote cancer-causing… https://t.co/zDNcTILe1e pic.twitter.com/Zfh2J1KACS
— ANI (@ANI) May 30, 2023
स्वच्छ मुख अभियानाचा 'स्माईल अॅम्बेसेडर’ झाल्यानंतर सचिननं सांगितलं की, 'माझ्या वडिलांना मी वचन दिलं होतं की तंबाखूच्या जाहिरातीमध्ये कधीच काम करणार नाही. मला तंबाखू कंपनीनं ऑफर्स पण दिल्या होत्या पण आज मी अभिमानानं सांगू शकतो की, आतापर्यंत तंबाखू कंपनीसोबत मी कोणताही व्यवहार केला नाहीये. '
स्वच्छ मुख अभियान म्हणजेच SMA ही ओरल हेल्थ आणि मुख स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल भारतीयांना शिक्षित करण्यासाठीची भारतीय डेंटल संघटनेनं (IDA) राबवलेली एक राष्ट्रीय मोहीम आहे. ही मोहीम केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे.
🕙 10.10am | 30-05-20203 | 📍Mumbai | स. १०.१० वा. | ३०-०५-२०२३ 📍 मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 30, 2023
🔸भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर आणि स्वच्छ मुख अभियान, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार
🔸Memorandum of Understanding between Bharat Ratna Shri Sachin Tendulkar and Swachh Mukh Abhiyan, Government… pic.twitter.com/gaOs17a1dj
संबंधित बातम्या
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने सावंतवाडीतील चिमुकल्याची इच्छा केली पूर्ण
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )