एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दाभोलकरांच्या हत्येदिवशी आरोपी सचिन अंदुरे कामावर गैरहजर
सचिन अंदुरे काम करत असलेल्या दुकानाचे मालक कर्मचाऱ्यांचं हजेरी रजिस्टर ठेवतात. त्यात सचिन अंदुरे 20 ऑगस्टला ज्यादिवशी दाभोलकरांची हत्या झाली, त्यादिवशी कामावर नसल्याची नोंद आहे. सीबीआयने हे हजेरी रजिस्टर जप्त केलं आहे.
औरंगाबाद | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे आली आहे. सीबीआयच्या ताब्यात असलेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे औरंगाबादेतील ज्या कापड दुकानात कामाला होता, तिथे तो 20 ऑगस्टला म्हणजेच दाभोलकर यांच्या हत्येदिवशी कामावर गैरहजर होता.
सचिन अंदुरे काम करत असलेल्या दुकानाचे मालक कर्मचाऱ्यांचं हजेरी रजिस्टर ठेवतात. त्यात सचिन अंदुरे 20 ऑगस्टला ज्यादिवशी दाभोलकरांची हत्या झाली, त्यादिवशी कामावर नसल्याची नोंद आहे. सीबीआयने हे हजेरी रजिस्टर जप्त केलं आहे.
दाभोलकर हा हत्या प्रकरणात हे रजिस्टर सीबीआयसाठी मोठा पुरावा ठरु शकतं. 19 ऑगस्टला सचिन अंदुरेची साप्ताहिक सुट्टी होती आणि 20 ऑगस्टला हजेरी राजिस्टरवर सचिनची रजिस्टरवर सहीच नाही. त्यामुळे अंदुरेकडे याबाबत चौकशी कऱण्यात येणार आहे.
काँग्रेसने कच खाल्ली नसती तर 2008 मध्येच सनातनवर बंदी आली असती : श्याम मानव
2008 साली तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी सनातन संस्थेविरोधात महत्वाची माहिती जमा केली होती. मात्र, त्यावेळच्या सरकारनं कच खाल्ली. 2008 साली सनातनवर बंदीचा प्रस्ताव तयार झाला होता. तो अंमलात आला असता तर पुढं झालेल्या चार हत्या टळल्या असत्या, असं दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे.
नालासोपारा शस्त्रासाठा प्रकरणाच्या तपासावेळी श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, आमदार जितेंद्र आव्हाड हे हिटलिस्टवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मानव यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जयंत आठवले आणि आपल्यात पूर्वी मैत्रीचे संबंध असल्याचंही सांगितलं.
संबंधित बातम्या
सचिन अंदुरेच्या कोठडीत वाढ, कळसकरसोबत समोरासमोर चौकशी होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement